दिल्ली : श्रीलंका (sri lanka) आर्थिक संकटाला तोंड देत असून मध्यरात्री पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा (resigns) दिला आहे. सभागृह नेते आणि शिक्षण मंत्री दिनेश गुणवर्धने यांनी सांगितलं की, मंत्रिमंडळाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान, राजीनामा का सुपूर्द केला. याचे कारण मात्र त्यांनी दिले नाही. राजकीय स्थैर्य राखण्यासाठी आणि आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी श्रीलंकेत सर्व पक्षीय सरकार स्थापन होण्याची मागणी होते आहे. श्रीलंकेच्या रविवारी मध्य प्रांतामध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय. सरकारचा निषेध करणाऱ्या पेरादेनिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांवर अश्रुधुराचा मारा यावेळी करण्यात आला. विद्यार्थी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याची मागणी यावेळी करत होते. श्रीलंकेत पेपरची किंमत वाढल्याने परीक्षा होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. दरम्यान, पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे अवघ्या जगाचं लक्ष श्रीलंकेवर लागून आहे.
Sri Lanka’s cabinet resigned en masse from their positions at a late-night meeting, AFP News Agency quotes the Education Minister.
— ANI (@ANI) April 3, 2022
श्रीलंकेत पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. महिंदा राजपक्षे यांचा मुलगा नमल राजपक्षे यांनीही आपल्या सर्व खात्यांचा राजीनामा दिला आहे. नमल राजपक्षे यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी राष्ट्रपतींना सर्व विभागांच्या माझ्या राजीनाम्याबद्दल तात्काळ कळवले आहे, आशा आहे की यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना देशात स्थैर्य प्रस्थापित करण्यात मदत होईल. मी आणि माझा पक्ष आमच्या मतदारांसाठी वचनबद्ध आहोत.’
I have informed the sec. to the President of my resignation from all portfolios with immediate effect, in hope that it may assist HE & PMs decision to establish stability for the people & the govt of #LKA. I remain committed to my voters, my party & the people of #Hambanthota.
— Namal Rajapaksa (@RajapaksaNamal) April 3, 2022
श्रीलंकेत सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली होती. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम, टॉकटॉक, स्नॅपचॅट, व्हॉट्सअॅप, व्हायबर, टेलिग्राम आणि फेसबुक मेसेंजरच्या सेवा पंधरा तासांनंतर पूर्ववत करण्यात आल्या.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात रविवारी लोकांनी निदर्शने केली. आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा विशेष राजपत्र अधिसूचना जारी करून श्रीलंकेत 1 एप्रिलपासून आणीबाणी जाहीर केली आहे. आता राष्ट्रपती राजपक्षे यांच्या आणीबाणी लादण्याच्या निर्णयाविरोधात कोलंबोमध्ये आंदोलन केलं जातंय.
इतर बातम्या
Delhi CCTV | ‘मॉर्निंग वॉक’ला निघालेल्या दोघांना अडवलं, भररस्त्यात लुटीचा थरार
Emotional video : एकदा तरी पप्पा तुम्ही या हो सणाला…; कवितेतून पोलिसानं मांडली व्यथा, ऐका