श्री जयवर्दनेपुरा कोट्टे : श्रीलंकेच्या नौदलाने (Sri Lanka Navy) जवळपास 54 भारतीय मच्छिमारांना (Indian Fishermen) अटक केलीय. या मच्छिमारांची 5 जहाजंही ताब्यात घेण्यात आलीत. या मच्छिमारांनी श्रीलंकेच्या हद्दीत बेकायदेशीर मासेमारी केल्याचा आरोप श्रीलंकेच्या नौदलाने केलाय. गुरुवारी (25 मार्च) दिलेल्या एका अधिकृत निवेदनात त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी बुधवारी या मच्छिमारांवर कारवाई करत अटक केली आहे (Sri Lanka Navy arrest 54 Indian Fishermen for illegal entry in their boundary).
नौदलाने म्हटले, “स्थानिक मच्छिमारांचा समुह आणि श्रीलंकेतील मत्स्यपालनाचं स्थैर्य यासाठी श्रीलंकेच्या सरकारने परदेशी बेकायदेशीर मच्छिमारांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून श्रीलंकेचं नौदल श्रीलंकेच्या हद्दीत मासेमारी करणाऱ्यांवर देखरेख ठेवत टेहाळणी करते. या टेहाळणीत जाफनाच्या कोविलन किनारपट्टीपासून 3 नॉटिकल मिल अंतरावर भारताच्या मच्छिमारांचं मोठं जहाज ताब्यात घेण्यात आलंय. या जहाजावर 14 मच्छिमार होते.”
मच्छिमारांवर श्रीलंकेच्या समुद्र हद्दीत शिरकाव केल्याचा आरोप
श्रीलंकन नौदलाने सांगितलं की मन्नारपासून 7 नॉटिकल मिल अंतरावर आणि इरानातिवू बेटापासून 5 नॉटिकल मिल अंतरावर आणखी 2 भारतीय जहाजं ताब्यात घेण्यात आलीत. दोन्ही जहाजांवर एकूण 20 लोक होते. ही जहाजं ताब्यात घेण्यात आली आहेत आणि मच्छिमारांना अटक करण्यात आलीय.”
मच्छिमारांच्या प्रश्नावरुन भारत-श्रीलंकेच्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम
श्रीलंकन नौदलाने याआधीही भारतीय अधिकाऱ्यांना भारतीय मच्छिमारांकडून होणाऱ्या हद्दीच्या उल्लंघनाबाबत माहिती दिली होती. दोन्ही देशांच्या मच्छिमारांना एकमेकांच्या हद्दीत अनावधानाने जाण्यासाठी नेहमीच अटक होत राहते. या मच्छिमारांचा विषय नेहमीच भारत आणि श्रीलंका द्विपक्षीय संबंधांवर परिणाम करत आला आहे. जानेवारीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी श्रीलंकेचा दौरा केला. या दरम्यान, त्यांनी श्रीलंकेचे मत्स्य मंत्री डगलस देवनंदा यांचीही बेट घेत मच्छिमारांचा प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा :
मासे पकडण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या 8 वर्षीय मुलाला मगरीने गिळलं, त्यानंतर थरारक घटनाक्रम…
मच्छीमारांना डिझेल परताव्याची रक्कम मिळणार, अजित पवारांची 40 कोटी 65 लाखांच्या निधीला मंजुरी
जीवघेण्या बांगलादेशी माशाची महाराष्ट्रात घुसखोरी
व्हिडीओ पाहा :
Sri Lanka Navy arrest 54 Indian Fishermen for illegal entry in their boundary