न्यूयॉर्क | 4 ऑक्टोबर 2023 : भारतीय घटनेचे शिल्पकार देशाचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Bhimrao Ramji Ambedkar ) यांचा देशाबाहेरील सर्वात मोठा पुतळ्याचे अनावर अमेरिकेतील मॅरीलँड राज्यात होत आहे. येत्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी ‘स्टॅच्यु ऑफ इक्वलिटी’ नावाने या भव्य पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरने ( AIC ) या पुतळ्याची उभारणी केली आहे. ही संस्था डॉ. आंबेडकर यांचे स्वातंत्र्य, समानता आणि सामाजिक न्याय या विचारांच्या प्रसाराचे काम करते.
आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरद्वारे स्टॅच्यू ऑफ इक्वलिटीची स्थापना मॅरीलँडच्या ॲकोकीक येथे 13 एकरावर विकसित केलेल्या डॉ. बी.आर.आंबेडकर स्मृती पार्कात करण्यात आली आहे. या डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे. या पुतळ्याची उंची 19 फूट इतकी आहे. राम सुतार यांनीच सरदार पटेल यांच्या गुजरात येथील केवडीया येथील सर्वात उंच ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ या पुतळ्याची उभारणी केली आहे. हा पुतळा अमेरिकेतील भारतीय प्रवाशांसोबतच आंबेडकरांचे कार्यांमुळे प्रभावित झालेल्या जगभरातील आंबेडकर प्रेमींना प्रेरणा देणार आहे. या कार्यक्रमा अमेरितील डॉ. आंबडेकर याचे अनुयायी उपस्थित राहणार आहेत.
घटनातज्ज्ञ, थोर अर्थशास्रज्ञ आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य भारत प्रांतात ( आता मध्यप्रदेश ) महू नगर सैन्य छावणीत झाला होता. त्यांनी सातारा येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटीमधून स्नातक पदवी आणि अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ नंतर लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी दलिताच्या उद्धारासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य वेचले. त्यांचा परदेशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पुतळा सामाजिक चळवळीतील अनेकांना प्रेरणा देईल असे आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरने म्हटले आहे.