बगदाद हादरलं!, आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू

| Updated on: Jan 21, 2021 | 5:09 PM

बगदादमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात (Suicide bomb blast) 30 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बगदाद हादरलं!, आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली: इराकची (iraq) राजधानी बगदाद (Baghdad) पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरली आहे. बगदादमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात (Suicide bomb blast) 30 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 20 जण या स्फोटामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. (Iraq capital Baghdad suicide bomb attack in today death toll will  increased)

पोलीस आणि वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीनं बॉम्ब स्वत:च्या शरिरावर लावून बगदादमधील बाजारात प्रवेश केला आणि स्फोट घडवून आणला. ही घटना बगदादमधील तायरण चौकात घडली आहे.पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आसल्याची माहिती दिली आहे. स्फोटातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त रीट्रस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

इराकची राजधानी बगदादमध्ये आज झालेला अतिरेकी हल्ला 2017 नंतरचा सर्वात मोठा हल्ला आहे. इराकमधील या हल्ल्याची आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

आजारी असल्याचं नाटक

बगदाद बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या वाढत असली तरी अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. हा हल्ला इसिसस संघटनेने केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हल्लेखोरानं प्रथम आजारी असल्याचं नाटक करुन बाजारपेठेत प्रवेश केला. आजारी असल्याचं नाटक केल्यानं जमाव झाला. गर्दी झालेली पाहून त्यानं स्वत: ला उडवून दिलं. दुसरा हल्लेखोर मोटारसायकलवरुन आला त्यानेही स्वत: ला उडवून दिलं.

17 जानेवारीला देखील बॉम्बस्फोट

इराकमधील मोसूल जवळ रविवारी 17 जानेवारीला बॉम्बस्फोट झाला होता. त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये 6 सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा आणि एक नागरिक अशा 7 जणांचा मृत्यू झाला होता.

चार दिवसांच्या अंतरामध्येच दुसरा बॉम्बस्फोट झाल्यामुळे इराकमधील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


संबंधित बातम्या:

युद्धाचे ढग! इराणने अमेरिकेच्या युद्धनौकेपासून अवघ्या 100 मैलांवर डागली मिसाईल

इंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू

US President : जो बायडन राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या पहिल्या दिवशीच 1.1 कोटी लोक होणार अमेरिकन नागरिक?


(Iraq capital Baghdad suicide bomb attack in today death toll will  increased)