नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये (Britain) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या लहरी आणि मनमानी धोरणांना कटांळून तेथील खासदार आणि मंत्र्यांच्या राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत जवळपास 50 जणांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर दबाव वाढल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही राजीनाम्याची घोषणा केली. आता बोरीस जॉन्सन यांच्यानंतर ब्रिटनचा नवा पंतप्रधान कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव आहे ते म्हणजे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचे. बोरीस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदासाठी सहा नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये परराष्ट्रमंत्री जेरेमी हांट, अर्थमंत्री नदीम जाहवी, वाणिज्य व व्यापारमंत्री पेनी मॉर्डेट, संरक्षणमंत्री बेन वॉलेस, कॉमनवेल्थमंत्री विंज ट्रस व माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र या सर्वांमध्ये सुनक यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.
ब्रिटनचा नवा पंतप्रधान कोण असणार? याबाबत ‘इप्सॉस’ने एक सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये 31 टक्के ब्रिटिश नागरिकांनी पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांच्या नावाला पंसती दिली आहे. ऋषी सुनक हे पंतप्रधान म्हणून चांगले काम करतील असे ब्रिटिश नागरिकांनी म्हटले आहे. पंतप्रधानपदासाठी इच्छूक असणाऱ्या इतर कोणत्याही उमेदवारापेक्षा ऋषी सुनक यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात. ऋषी सुनक हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. जर ते ब्रिटनेच पंतप्रधान झाले तर ब्रिटनवर भारतीयांचे राज्य आले असे म्हटले जाऊ शकते. तेथील घटनेनुसार येत्या ऑक्टोबरपर्यंत सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून पंतप्रधानपदासाठी नेता निवडण्यात येणार आहे.
?Research conducted by Ipsos this week showed 31% of British adults think Rishi Sunak, who resigned as Chancellor on Tuesday, would do a good job as prime minister – the highest of any Tory contender in the race to succeed Boris Johnson https://t.co/scbcHPdHZf
— The Telegraph (@Telegraph) July 7, 2022
ऋषी सुनक हे मुळ भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे आईवडील आधी केनियाला स्थायिक झाले होते. त्यानंतर ते ब्रिटनला आले. ऋषी सुनक यांचा जन्म ब्रिटनमध्येच झाला. त्यांना वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. ते 2020 मध्ये ब्रिटनचे अर्थमंत्री बनले. मात्र याच काळात जगभरात कोरोनाची साथ आली. कोरोनाच्या या भयावह लाटेतही सुनक यांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था टिकून ठेवली. अर्थव्यवस्थेला कमीत कमी फटका कसा बसेल यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले. तसेच कोरोना लाट ओसरल्यानंतर देखील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आता ते ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.