Sunita Williams : सुनीता विलियम्स संकटात; बोईंग कॅप्सूल पण नाही येणार उपयोगात, आता NASA काय करणार?, पृथ्वीवर कशी परतणार अंतराळवीर?

| Updated on: Aug 25, 2024 | 5:16 PM

Sunita Williams NASA : भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर सध्या अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांचा आठ दिवसांचा मुक्काम आता दोन महिन्यांहून अधिक काळ लांबला आहे. पृथ्वीवर कशी परतणार ही अंतराळवीर?

Sunita Williams : सुनीता विलियम्स संकटात; बोईंग कॅप्सूल पण नाही येणार उपयोगात, आता NASA काय करणार?, पृथ्वीवर कशी परतणार अंतराळवीर?
बोईंगाला मोठा झटका
Follow us on

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA सध्या अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना परत कसं आणावं या चिंतेत आहे. भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर सध्या अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांचा आठ दिवसांचा मुक्काम आता दोन महिन्यांहून अधिक काळ लांबला आहे. त्यांना बोईंग कॅप्सूलने परत आणण्याचा विचार होता. पण ही योजना बारगळली. शनिवारी नासाने बोईंग कॅप्सूलचा वापर न करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचा फटका या कंपनीला बसला आहे.

बोईंगला एकामागून एक झटके

अमेरिकन इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानात अग्रेसर असलेली प्रतिष्ठित कंपनी बोईंगला गेल्या काही वर्षांपासून झटक्यावर झटके बसत आहेत. 2018 आणि 2019 मध्ये 737 मॅक्स विमान दुर्घटनाग्रस्त झाले. तेव्हापासून बोईंगवरचा जगाचा विश्वास कमी झाला. या दुर्घटनेत 346 लोक ठार झाले होते. तर या वर्षी जानेवारी महिन्यात एका उड्डाणावेळी मॅक्सचे पॅनल फाटल्याने बोईंग पुन्हा अडचणीत सापडले. या कंपनीचे सर्व उत्पादनांची पुन्हा नव्याने सुरक्षेची समीक्षा सुरु झाली. बोईंग स्टारलायनर कॅप्सूलवर विश्वास दाखवणे अवघड असल्याने अंतराळवीरांना या कॅप्सूलमधून परत आणणे धोक्याचे असल्याचे मत नासाचे झाले आहे. त्यामुळे अंतराळवीरांना पुढील फेब्रुवारीपर्यंत अंतरिक्षात ठेवण्याचा निर्णय नासाने घेतला आहे. या कॅप्सूलमधील बिघाड पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. बोईंगला हा मोठा झटका मानण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

या घडामोडी बोईंगसाठी अपशकून

एअरोस्पेसचे विश्लेषक रिचर्ड अबोलाफिया यांनी बोईंगला मोठी चपराक लगावली. सध्याची सर्व घडामोड हा बोईंगसाठी मोठा अपशकून असल्याचा दावा अबोलाफिया यांनी केला आहे. काही काळ या गोष्टी कंपनीला सहन कराव्या लागतील, असा दावा त्यांनी केला आहे. बोईंगने 2018 मध्ये 25 अब्ज डॉलरहून अधिकचे नुकसान झाले. या दुर्घटनांमुळे या कंपनीच्या विमान निर्मिती प्रक्रियेला मोठा झटका बसला. त्यानंतर संरक्षण आणि अंतराळ विषयात 2021 पर्यंत कंपनीने चांगले काम केले. त्याचा कंपनीला मोठा फायदा झाला. तिचा महसूल आणि नफा वाढला. पण आता नासाच्या भूमिकेने बोईंग कंपनीच्या प्रतिष्ठेला झटका बसला आहे.