अंतराळातील वातावरण पृथ्वीवरील वातावरणापेक्षा अत्यंत वेगळं असतं. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर तब्बल दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या दोन्ही अंतराळांच्या शरीरावर तेथील वातावरणाचा हळूहळू परिणाम होत आहे. त्यांचं शरीर आजारी पडत आहे. एका रिपोर्ट्सनुसार या दोन्ही अंतराळवीरांना 2025मध्ये पृथ्वीवर आणलं जाऊ शकतं. त्यामुळे तब्बल वर्ष दीड वर्ष अंतराळात राहिल्याने या दोघांच्या शरीरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
1. अवकाशात तांबड्या पेशी नष्ट होतात
एक्सपर्टच्या माहितीनुसार, बराच काळ अंतराळात राहिल्याने रेड ब्लड सेल्स म्हणजे तांबड्या पेशी नष्ट होतात. त्याशिवाय डोळे, हार्ट सिस्टिम आणि बोन्स डेन्सिटीवरही त्याचा परिणाम होत असतो. अंतराळातील रेडिएशन मानवी शरीरातील तांबड्या पेशी नष्ट करते. त्यामुळे व्यक्तीला अंतराळात ॲनिमिया होऊ शकतो.
2. म्यूटेशनमुळे जेनेटिक डिसऑर्डर होणार
अंतराळात रेडिएशनमुळे डीएनए हळूहळू डॅमेज होतो. डीएनए स्टँड तुटल्यामुळे म्यूटेशन होतो. म्यूटेशनमुळे व्यक्तीला जेनेटिक डिसऑर्डर होऊ शकतो. 1998 पासून 2001च्या दरम्यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये सुमारे 1 ते 3 दिवसांचे स्पेस मिशन झाले होते. मिशन लॉन्च करण्यापूर्वी शास्त्रज्ञांनी अंतराळवीरांचे ब्लड सँपल घेतले होते. त्यानंतर लँडिंगच्या तीन दिवसानंतर ब्लडमध्ये फ्री-फ्लोटिंग मायटोकॉन्ड्रियल डीएनए वाढला होता.
3. सुनीताला स्पेस ॲनिमिया होऊ शकतो
आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला दोन मिलियन तांबड्या पेशी तयार होतात. तसेच त्या नष्टही होतात. एका अभ्यासानुसार, स्पेसमध्ये शरीर प्रति सेकंदाला तीन मिलियन सेल्स डॅमेज करतात. अंतराळात मानावाचे फ्लूड 10 टक्के नष्ट होते. त्यामुळेच सुनीताला स्पेस ॲनिमियासोबतच जेनेटिक डिसऑर्डर होण्याची शक्यता अधिक आहे.
कुटुंबीयांशी संवाद
अंतराळात असलेल्या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीसारखीच सुविधा मिळते. अंतराळवीरांकडे जेव्हा कधी अतिरिक्त वेळ असतो तेव्हा ते आपले मित्र आणि कुटुंबासोबत ईमेल, कॉलवर संपर्क साधून असतात. एवढेच नाही तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही ते करतात. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांच्या संपर्कात राहता येतं. स्टारलाइनर मिशनचे दोन्ही अंतराळवीर केवळ एक आठवड्यासाठी अंतराळात गेले होते. आता त्यांना पुढील वर्षापर्यंत तिथे राहावं लागेल अशी चिन्हे आहेत.