स्वित्झर्लंड : स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो(Svante Pabo) यांना नोबेल पुरस्कारने( Nobel Prize) सन्मानित करण्यात आले आहे. 2022 वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पाबो यांना प्रदान करण्यात आला आहे. पाबो यांनी 40 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या मानवांच्या प्रजातीचे यशस्वी संशोधन केले आहे. नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी एक आहे.
स्वंते पाबो यांना विलुप्त होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिक (जीनोम) संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पाबो हे पॅलेओजेनेटिक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत, ज्यांनी निएंडरथल जीनोमवर सखोल संशोधन केले आहे.
जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील मेंजेनेटिक्स विभागाचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
पाबो हे एक आनुवंशिकशास्त्रज्ञ आहे. उत्क्रांतीविषयक अनुवांशिक क्षेत्रातील ते तज्ञ आहे. त्यांनी निएंडरथल जीनोमवर बरेच काम केले.
निएंडरथल या मानवी प्रजातीचे त्यांनी संशोधन केले. हा मानवी वंशाची नामशेष झालेली प्रजाती आहे. जर्मनीतील निएंडर व्हॅलीमध्ये आदी मानवाची काही हाडे सापडली होती, त्या आधारावर त्यांना निएंडरथल मानव असे नाव देण्यात आले.
या मानवी प्रजातीची उंची इतर मानवांपेक्षा लहान होती. यांची उंची 4.5 ते 5.5 फूट होती. यांच्या केसांचा रंग काळा आणि त्वचा पिवळी होती. हे पश्चिम युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत राहत होते. हे मानव सुमारे 1.60 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर वास्तव्य करत करत असल्याचा पुरातत्वशास्त्रज्ञांचा दावा आहे.