भारताचा शेजारी असलेला देश पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या 16 अणुशास्त्राज्ञांचं अपहरण करण्यात आलं आहे. दहशतवादी संघटना असलेल्या तहरीक -ए तालिबान पाकिस्तान (TTP) नं या अणुशास्त्राज्ञांचं अपहरण केलं आहे. तहरीक -ए तालिबान पाकिस्तानने अपहरण करण्यात आलेल्या या शास्त्राज्ञांचा एक व्हिडीओ जारी केला आहे. टीटीपीकडून जारी करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी शास्त्रज्ञ शाहबाज यांनी सरकारला विनंती केली आहे की, तुम्ही दहशतवाद्यांच्या अटी मान्य करा, त्यांच्या तावडीतून आमची सुटका करा.
तालिबानकडून पाकिस्तानच्या अपहरण करण्यात आलेल्या 16 अणुशास्त्राज्ञांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचे अणुशास्त्र असलेले शाहबाज यांनी पाकिस्तान सरकारला दहशतवाद्यांच्या अटी मान्य करण्याची विनंती केली आहे.तालीबानच्या अटी मान्य करून आमची सुखरूप सुटका करा असं या शास्त्रज्ञाने म्हटलं आहे. पाकिस्तानचे 16 शास्त्रज्ञ सध्या तालीबानच्या ताब्यात आहेत.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. टीटीपीने पाकिस्तानच्या ज्या 16 अणुशास्त्राज्ञांचं अपहरण केलं त्यामध्ये पाकिस्तानच्या ऊर्जा आयोगाच्या इंजीनिअरचा देखील समावेश आहे. तालीबानकडून पाकिस्तानच्या 16 अणुशास्त्राज्ञांचं अपहरण करण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
TTP has released an exclusive video of the abducted employees of Atomic Energy. The 16-18 employees were abducted, who were working in the Qabul Khel Atomic Energy mining project in Lakki Marwat. The armed man has also ablazed the company’s staff vehicle. pic.twitter.com/3Uq7jhSGkI
— Jawad Yousafzai (@JawadYousufxai) January 9, 2025
युरेनियमची देखील लूट केल्याचा दावा
तालिबानकडून केवळ पाकिस्तानच्या अणुशास्त्राज्ञांचंच अपहरण करण्यात आलेलं नाही तर पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या युरेनियमच्या खानीमधून मोठ्याप्रमाणात युरेनियमची देखील लूट करण्यात आली आहे. या युरेनियमचा वापर हा अणूबॉम्ब बनवण्यासाठी होतो. यावर बोलताना तालीबानच्या नेत्यानं म्हटलं आहे की, आम्ही या अणुशास्त्राज्ञांच अपहरण त्यांना नुकसान पोहोचण्यासाठी नाही तर आमच्या अटी मान्य करण्यासाठी केलं आहे.