20 जुलैला नवा राष्ट्रपती
Image Credit source: social media
कोलंबो : सध्या श्रीलंका (Sri Lanka) एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांचा संयम सूटू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून श्रीलंकेत जोरदार आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी शनिवारी दुपारी एकत्र येत राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातल्यानंतर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa)यांनी आपल्या निवासस्थानातून पलायन केले. आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीत तर शनिवारी रात्री त्यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या निवासस्थाकडे कूच केली. यावेळी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करण्यात आला. त्यामुळे आंदोलक आधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्या घराला आग लावली. दरम्यान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. तर गोटबाया हे 13 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. जाणून घेऊयात या घडामोडींबाबत दहा मोठे मुद्दे.
दहा महत्त्वाच्या घडामोडी
- श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे 13 जूलै रोजी राजीनामा देणार आहेत. याबाबत लोकसभा अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी माहिती दिली. काल याच पार्श्वभूमीवर अभयवर्धने यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती.
- या सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यातील पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. तर आपण 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचे राजपक्षे यांनी अध्यक्षांना पत्राद्वारे कळवले आहे.
- या बैठकीपूर्वी श्रीलंकन जनतेकडून देखील गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलकांनी राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. यानंतर राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पलायन केले.
- दरम्यान त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घराकडे वळवला. आक्रमक आंदोलकांनी विक्रमसिंघे यांचे घर पेटवले.
- संतप्त आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन रानिल विक्रमसिंघ यांनी राजीनामा दिला आहे. तर राजपकक्षे हे 13 तारखेला राजीनामा देणार आहेत.
- रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेच्या आणखी दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. ज्यामध्ये हरिन फर्नांडो आणि मानुषा नानायक्कारा यांच्या नावाचा समावेश आहे.
- श्रीलंकेत परिस्थिती आता आणखी गंभीर बनल्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.
- श्रीलंकेत कडेकोड पोलीस बंदोबस्त आहे. सैन्यदल देखील रस्त्यावर उतरले आहे. कर्फ्यू लागू केल्यानंतर देखील नागरिकांचे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये वाद होत आहेत.
- पंतप्रधानाच्या निवासस्थानाबाहेर चार पत्रकारांवर देखेली आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
- श्रीलंकेकडील विदेशी गंगाजळीचा साठा प्रचंड प्रमाणात घटल्याने त्यांना वस्तू आायत करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना कारावा लागत आहे.