भारतासोबत पंगा मालदीवला महागात पडला, पर्यटकांची पाठ, अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला

| Updated on: Jun 19, 2024 | 5:30 PM

2024 वर्षात मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांची आतापर्यंत दैनिक सरासरी 5,709 आहे. येथे भेट देणारे पर्यटक सरासरी आठ दिवस इथे मुक्काम करत आहेत. चीन 60,699 अभ्यागतांसह आघाडीवर आहे. त्यानंतर रशिया, इटली आणि युनायटेड स्टेट्स येथील पर्यटक आहेत.

भारतासोबत पंगा मालदीवला महागात पडला, पर्यटकांची पाठ, अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला
pm modi and mouiiju
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमध्ये मजबूत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध होते. मात्र, हे संबध गेल्या वर्षभरात बिघडले आहेत. जानेवारी 2024 मध्ये मालदीवचे कॅबिनेट मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यामुळे या दोन्ही देशात तणाव वाढला होता. त्यातच भारतीय पर्यटकानी मालदीवकडे पाठ फिरविली होती. त्याचा परिणाम आता मालदिवला दिसू लागला आहे. मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत या वर्षी जूनमध्ये 2.5 टक्क्यांनी घट झाली आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने एक अहवाल जारी केला आहे. यानुसार जूनमध्ये आतापर्यंत 44,013 हून अधिक पर्यटकांनी समुद्रकिनारी असलेल्या देशांना भेट दिली आहे.

1 जून ते 12 जून दरम्यान वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण 44,013 पर्यटकांचे स्वागत करण्यात आले, असे अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 च्या 8,54,405 च्या तुलनेत या वर्षाच्या सुरुवातीला 9.6 टक्के वाढ झाली आहे. 2022 च्या 7,47,183 पेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. जूनमध्ये दररोज सरासरी 3,668 पर्यटकांनी मालदीवला भेट दिली आहे. किमान सात दिवस पर्यटक मालदीवमध्ये मुक्काम करत आहेत.

2024 च्या सुरुवातीपासून मालदीवने एकूण 9,36,258 अभ्यागतांचे स्वागत केले आहे. जानेवारीमध्ये (1,92,385). फेब्रुवारी (2,17,392), मार्च (1,94,227), एप्रिल (1,68,366) आणि मे महिन्यात 1,19,875 पर्यटकांनी मालदीवला भेट दिली आहे. 2024 मध्ये आतापर्यंतची दैनिक सरासरी 5,709 आहे आणि पर्यटक सरासरी आठ दिवस मुक्काम करत आहेत. चीनच्या 60,699 पर्यटकांनी मालदीवला भेट दिली आहे. त्यानंतर रशिया, इटली आणि युनायटेड स्टेट्स आहेत. परंतु, मागील तीन वर्षांपासून पर्यटकांच्या आगमनात आघाडीवर असलेला भारतातील केवळ 31 हजार 437 पर्यटकांनी भेट दिली आहे. भारताच्या पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरविल्यामुळे त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

मालदीव देशावर आधीच कर्जाचा बोझा आहे. अशावेळी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताशी पंगा घेत चीनला जवळ केले. त्यामुळे भारताने मालदीवला देत असलेल्या मदतीचा हात आखडता घेतला. दुसरीकडे मालदीवर चीनचे एकूण 20 टक्के कर्ज आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मालदीवला चीनकडून आणखी कर्ज घेतल्यास त्याचे प्रमाण तब्बल 37% होणार आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, मालदीववर चीनचे 1.37 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. चीनच्या जवळ जाणे मालदीवला भविष्याच महागाड पडू शकते अशी भीती आयएमएफने व्यक्त केली आहे.