नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : लग्न झालेल्या एका कपलने त्यांच्या आयुष्यातील टॉप सिक्रेट सांगितलं आहे. लग्नाला तीन वर्ष झालीत. तेव्हापासून एकत्र आलेले नाहीत. दोघेही वेगवेगळी रुम शेअर करतात. त्याचं कारण दोघेही दुसऱ्यांना डेट करत असतात. 60 वर्षाची लिसा वॅन सँड आणि 63 वर्षाच्या एव्हरेट हार्लो यांनी हे सिक्रेट शेअर केलंय. दोघेही अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहतात. दोघांच्या अतार्किक प्रेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून नैतिक-अनैतिकतेवरही भाष्य केलं जात आहे.
या प्रकाराची सुरुवात कशी झाली, याची माहिती लिसाने दिलीय. सुरुवातील दोघेही नवरा बायको खूश होते. त्यानंतर एक दिवस फेब्रुवारी 2010 मध्ये तिच्या नवऱ्याने त्याचं एका महिलेसोबत अफेयर असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे नवऱ्याने ही गोष्ट सांगितल्यानंतर ही महिला रागावण्याऐवजी खूश झाली. तिने आनंद व्यक्त केला.
त्यानंतर या दोघांनी दुसऱ्या लोकांना डेट करायला सुरुवात केली. दोघेही आजही दुसऱ्यांना डेट करत असतात. गेल्या पाच वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. एव्हरेट तर आतापर्यंत पाच रिलेशनशीपमध्ये राहिले आहेत. लिसाचेही तीन बॉयफ्रेंड आहेत. तिचे तिन्ही बॉयफ्रेंड देशातील वेगवेगळ्या भागात राहतात. विशेष म्हणजे बऱ्याच काळापासून तिचे हे बॉयफ्रेंड आहेत.
मात्र, आपण जे करतोय हे चुकीचं असल्याचं मान्य आहे. कुणासाठीही आमचं हे कृत्य आदर्श नाही. पण आमच्याबाबतीत ते घडलंय. विवाहित लोक असं आयुष्य जगत नाहीत. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने आयुष्य जगत असतो. आमच्या आयुष्यात बरंच काही घडलं. पण अजूनही एव्हरेट आणि माझं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. असं असूनही आम्ही दुसऱ्यांनाही डेट करतो, असं लिसा म्हणते.
आमच्याकडे जी क्वॉलिटी नाही, ती आम्हाला आमच्या इतर पार्टनरकडून मिळते. माझा नवरा रोमांटिक नाहीये, त्यामुळे त्यांना माझ्यासोबत जे रोमांटिक राहतात ते लोक आवडतात, असं सांगतानाच एव्हरेट फिजिकल कनेक्शनकडे अधिक आकर्षक होतो, असंही ती सांगते. एका मित्राच्या माध्यमातून 1986मध्ये एव्हरेटला भेटल्याचं ती सांगते. त्यानंतर दोन महिन्यातच साखरपुडा झाला. नंतर 1987मध्ये विवाह केला.