कोरोना लस घ्यायची आहे, पण इंजेक्शनला घाबरताय? काळजी नको, आता कोविड-19 टॅब्लेटवर रिसर्च सुरु

| Updated on: Feb 25, 2021 | 4:35 PM

ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका व्हॅक्सीनची चीफ डेव्हलपर असलेल्या सारा गिल्बर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या टीमने इंजेक्शन फ्री लसीवर काम सुरु केलं आहे.

कोरोना लस घ्यायची आहे, पण इंजेक्शनला घाबरताय? काळजी नको, आता कोविड-19 टॅब्लेटवर रिसर्च सुरु
देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
Follow us on

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरणही सुरु आहे. हे लसीकरण इंजेक्शनच्या माध्यमातून होत आहे. मात्र, कोरोनाची लस घेण्यासाठी आता लवकरच इंजेक्शनसह टॅब्लेटही दिली जाऊ शकते. कारण ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ज्ञ यावर संशोधन करत आहेत. ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका व्हॅक्सीनची चीफ डेव्हलपर असलेल्या सारा गिल्बर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या टीमने इंजेक्शन फ्री लसीवर काम सुरु केलं आहे. ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.(The discovery of the corona vaccine in tablet form begins)

हाऊस ऑफ कॉमन्स सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी कमिटीला या संशोधनाबद्दल माहिती देताना सारा गिल्बर्ट यांनी सांगितलं की, ‘नेजल स्प्रेद्वारे अनेक फ्लू व्हॅक्सीन दिले जातात आणि आम्ही त्याच प्रकारे काम करणारं एखादं व्हॅक्सीन शोधत आहोत. तोंडावाटे केल्या जाणाऱ्या लसीकरणाबाबतही विचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते अशांना टॅब्लेटद्वारे लसीकरण केलं जाऊ शकतं.’

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये खास ट्रायल

दरम्यान, अशा प्रकारची टॅब्लेट बनायला उशीर लागू शकतो. कारण, त्याची सुरक्षा आणि होणाऱ्या परिणामांचं परीक्षण करण्यासाठी काही कालावधी लागतो, असंही गिल्बर्ट यांनी स्पष्ट केलंय. मिळालेल्या माहितीनुसार टॅब्लेटचं क्लिनिकल ट्रायल अमेरिकेत सुरु करण्यात आलं आहे. तर ब्रिटनमध्ये नेजल स्प्रेचं ट्रायल सुरु आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठात लहान मुलांसाठी सुरक्षित लसीचा शोध सुरु

ऑक्सफर्ड विद्यापीठाने ब्रिटनमध्ये या महिन्यात होणाऱ्या लसीकरणापूर्वी लहान मुलं आणि युवकांना कोव्हिड -19 व्हॅक्सीन सुरक्षा देणं आणि त्यांच्यातील प्रतिजैविकांच्या प्रतिक्रियेचं आकलन करण्यासाठी शोध सुरु केला आहे. या शोधकार्यात चेडॉक्स 1, एनकोवी -19 व्हॅक्सीनने 6 ते 17 वयोगटातील मुलं आणि तरुणांमध्ये किती परिणामकारक आहे, याचं आकलन केलं जाणार आहे.

संबंधित बातम्या :

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांना प्रवेशासाठी कोरोना अहवाल सक्तीचा

पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण असेल तर मग लसीकरणावर 35 हजार कोटींचा खर्च का? : IMA

The discovery of the corona vaccine in tablet form begins