त्याला एक अनोखा जॉब मिळाला, त्यामुळे त्याची शिक्षा झाली माफ, कोणता आहे हा जॉब

| Updated on: Jun 19, 2023 | 2:34 PM

त्याला 42 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची वर्तवणूक पाहून साल 2001 साली त्याला अनोखा महाकठीण जॉब सोपविण्यात आला.

त्याला एक अनोखा जॉब मिळाला, त्यामुळे त्याची शिक्षा झाली माफ, कोणता आहे हा जॉब
bhuiya shahjaha
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : जगात अनेक प्रकारचे जॉब असतात. अनेक व्यवसाय असतात. परंतू एखादा जॉबने तुम्हाला सुधारण्याची संधी मिळत असेल पण त्या पेशाच्या अटी भयानक असतील तर तुम्ही तो स्वीकारल का ? आपण कितीही निगरगट्ट असलो तरी काही जॉब स्वीकारणे हे काही ऐऱ्या गबळ्याचे काम नाही. हे काम केल्याने त्याला रात्रीची झोप यायची नाही. पण त्याने जर हे काम केले नसते तर अन्य कोणी करणारच होते. म्हणून त्याने ही जबाबदारी शिरावर घेतली होती. हा जगातील सर्वात अवघड जॉब असून ज्यास करण्यास भलेभले घाबरतात..पाहया कोणता आहे हा जॉब

जगातील सर्वात कठीण जॉब करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे, शाहजहां भुईयां. साल 1991 पासून कारागृहात बंद असणाऱ्या या व्यक्तीला एका दरोडा आणि खून प्रकरणात जन्मठेप झाली होती. त्याला 42 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची वर्तवणूक पाहून साल 2001 साली त्याला अनोखा महाकठीण जॉब सोपविण्यात आला. काय आहे तो जॉब ?

बांग्लादेशातील ढाका मध्यवर्ती कारागृहातून काल रविवारी भुईया यांची सुटका करण्यात आली. बाहेरचा सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा पाहून इतकी वर्षे आत असलेल्या भुईया याला हायसे वाटले. साल 2001 रोजी तुरुंग प्रशासनाने जल्लादाची ड्यूटी सोपविली. त्याला वचन दिले की जर त्याने एकाला फाशीला दिले तर त्यांची दोन महिन्यांची शिक्षा माफ केली जाईल. आतापर्यंत त्याने २६ जणांना फासावर लटकवले आहे. त्यात अनेक हायप्रोफाईल लोकांची नावे असल्याचे म्हटले जात आहे.

फाशी दिल्यावर खूप वाईट वाटायचे

अशा प्रकारे या जल्लादाच्या जॉबची ड्यूटी केल्याने त्याची चार वर्षे चार महिन्यांची सजा माफ झाली होती. परंतू त्याची चांगली वर्तणूक पाहून त्याची उरलेली दहा वर्षांची शिक्षाही माफ झाली. भुईया याला एखाद्याला फाशी दिल्यावर खूप वाईट वाटायचे, परंतू त्याला हे देखील माहीती होते की जर त्याने हे काम केले नाही तर दुसरे कोणीतरी करणारच असे भुईया जल्लाद याने म्हटले आहे.

त्याची फाशी मी विसरणार नाही

मी धाडसी होतो त्यामुळे माझ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली, त्यांना माझ्यावर खूप विश्वास होता असे भईया जल्लाद याने सांगितले. आतापर्यंत त्याने जेवढ्या लोकांना फाशी दिली, त्यात मुनीरच्या फाशीला तो कधीही विसरणार नाही असे म्हणतो. फाशीपूर्वी मी त्याला शेवटची इच्छा काय आहे ? असे विचारले तर त्याने  सिगारेट्स ओढायची आहे असे सांगितले होते.