लंडन : महाराष्ट्राच्या राजकारणा प्रमाणेच ब्रिटनमध्येही मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे पदावरुन पाय उतार झाले आहेत. ज्या प्रमाणे महाराष्ट्रतील वृत्तवाहिन्यांवर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचे वृत्तांकन केले जात आहे. त्याच प्रमाणे ब्रिटनमध्ये देखील या संदर्भातील बातम्यांचे कव्हरेज केले जात आहे. बोरिस यांच्या संदर्भातील वृत्तांकन करताना न्यूज अँकरने विचित्र कृत्य केले. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन(PM Boris Johnson)यांच्या कंजर्वेटिव पक्षात मोठं बंड झाले आहे. 4 केंद्रीय मंत्र्यासह 40 जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळले असून त्यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. एका इंग्रजी वृत्त वाहिनीवर याचे लाईव्ह कव्हरेज सुरु असताना न्यूज अँकर चक्क पायावर पाय टाकून बसल्याचे दिसत आहे. कसे बसले आहोत हे लक्षात येताच हा न्यूज अँकर पुन्हा सावरुन बसत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
INCREDIBLE SCENES:
BBC News accidentally cut away to their news studio, showing a presenter with their feet on the desk. pic.twitter.com/FVvxaXTQUt
— Scott Bryan (@scottygb) July 6, 2022
पंतप्रधानांविरोधात अविश्वास एवढा वाढला की थेट सरकार कोसळण्याच्या स्थितीत आले. सर्व मंत्र्यांनी धडाधड आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे दिले. 36 तासांपूर्वी ज्यांना मंत्रिपद देण्यात आले होते, त्या मिशेल डोनेलन यांनीही राजीनामा दिला. बुधवारी संध्याकाळपर्यंत 17 कॅबिनेट, 12 सचिव आणि परदेशात नियुक्त केलेल्या 4 प्रतिनिधींनी राजीनामे दिले. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार पडले आणि त्यांना आपल्या पदावरुन पाय उतार व्हावे लागले.
बोरिस यांची कार्यपद्धती, लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेली पार्टी आणि काही नेत्यांचा सेक्स स्कँडलमधील सहभाग असे मुद्दे उपस्थित करत मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि मंत्रीपदाचे राजीनामे दिले.
बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसपूस सुरु होती. मंत्री मंडळातील मंत्र्यांसह पक्षातील अनेक नेते जॉन्सन यांच्यावर नाराज होते. यामुळे पक्षात बंडाचे वारे वाहत असल्याची बोरिस यांनाही कल्पना होती. मात्र अचानक अर्थमंत्री ऋषि सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी 5 जुलैला आपल्या पदाचा राजीनामा दिला. बोरिस जॉन्सन यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे या दोघांनी सांगितले. त्यानंतर सायमन हार्ट, ब्रँडन लुईस यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्र्यांच्या या गळतीमुळे विरोधकांनी थेट जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर त्यांना देखील पदाचा राजीनामा द्यावा लागला.
भारतीय वंशाचे उमेद्वार ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. बोरिस जॉन्सन सरकारमध्ये भारतीय वंशाचे अर्थमंत्री राहिलेले ऋषी सुनक हे देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वांत पुढे आहेत. सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. सुनक यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये इतिहास घडवला जेव्हा बोरिस जॉन्सन यांनी त्यांची देशाचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला, एका आघाडीच्या ब्रिटीश बुकीने देखील भाकीत केले होते की बोरिस जॉन्सन लवकरच राजीनामा देऊ शकतात आणि ऋषी सुनक त्यांच्या जागी नवीन पंतप्रधान होऊ शकतात.