दिल्ली : तब्बल 111 वर्षांपूर्वी बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पहायला गेलेल्या पाच जणांचा थांगपत्ता दोन दिवस झाले तरी लागलेला नाही. 18 जूनच्या सकाळी सहा वाजता सबमर्सिबलला समुद्रात सोडण्यात आले होते. त्यानंतर तासाभरातच तिचे नियंत्रण करणाऱ्या जहाजाशी तिचा संपर्क तुटला. 15 एप्रिल 1912 रोजी एटलांटीक महासागरात एका हिमनगाला धडकून हे अवाढव्य जहाज समुद्रात 1500 जणांना घेऊन रात्रीच्या अंधारात बुडाले, अनेक वर्षांनी त्याचा सांगडा कॅनडातील न्यूफाऊंडलॅंडजवळील समुद्रात सापडला. त्याला पाहायला छोट्या पाणबुडीतून गेलेले सहा अब्जाधीश समुद्रात नाहीसे झाले आहेत.
टायटॅनिकचे सांगडा दाखवण्याचे काम करणारी कंपनी ओशनगेट हीच्या सबमर्सिबल पानबुडीतून हे पाच जण रवाना झाले होते. समुद्राच्या आत 3,800 मीटर खोलीवर टायटॅनिकचे अवशेष पाहण्याचे काम रिस्की असून त्यासाठी 2 कोटी 5 लाख 10 हजार 625 फि आकारली जाते. जगातील पाच श्रीमंत व्यक्ती टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी अतिशय खोल समुद्रात तब्बल 3700 मीटर खोलीवर गेले आहेत, जगातील सर्वात उंच इमारत दुबईची बुर्ज खलीफा हीची उंची 829 मीटर आहे, यावरुन तुम्हाला 3,700 मीटर ( 12,500 फूट ) खोलीचा अंदाज येईल. यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल होत आहे.
TITANIC #OCEANGATE UPDATE: With less than 40 hours of oxygen left, How DEEP is the 5 passenger sub? Somewhere around 3700 Meters, where the Titanic is.
How deep is 3700? This scary video will show you. pic.twitter.com/f5kdGjOWUV— 24/7 (@100NEWS) June 21, 2023
टायटॅनिक जहाज दुर्घटनेनंतर काही वर्षांनी कॅनडाच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या त्याच्या अवशेषांना पाहण्याचे साहसी पर्यटन करायला जगातील पाच अब्जाधीश गेले होते. या पाच प्रवाशांमध्ये मूळ पाकिस्तानी बिझनेसमन शहजादा दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, भारतात आफिक्रेतून चित्ते आणणारे ब्रिटीश अब्जाधीश हामिश हार्दीग, फ्रेंच नागरीक पॉल आनरी नार्जेलेट आणि पाणडुबी संचलन करणाऱ्या कंपनीचे चीफ एक्झुकेटीव्ह स्टॉकटन रश यांचा समावेश आहे. 18 जून रोजी सकाळी सहा वाजता समुद्रात गेल्यानंतर 45 मिनिटांत त्यांचा संपर्क तुटला.
या लोकांचा शोध अमेरिकन आणि कॅनडाच्या नेव्हीने सर्च अभियान राबविले आहे. अमेरिकन तटरक्षक दलाला पाण्यातून आवाज ऐकायला आला आहे. कॅनाडाच्या के पी-3 विमानांनी त्यानंतर शोध मोहीम राबवूनही काही थांगपत्ता लागलेला नाही, शोध मोहीम सुरुच आहे. आता या छोटेखानी पानबुडीत केवळ 22 जूनपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सीजन शिल्लक आहे. रविवारी सकाळी जेव्हा टायटॅनिकचे अवशेष पहायला या पाणबुडीला ( टायटन ) आत समुद्रात सोडले तेव्हा तिच्यात 96 तास पुरेल इतकाच ऑक्सीजन होता.
जेव्हा कोणतेही जहाज समुद्रात खाली सोडतात, तेव्हाच त्यात ध्वनी उपकरण (acoustic device ) बसविले जाते. त्यास पिंगर म्हणतात. यातून निघणारा ध्वनी आणि तरंगाआधारे बचाव पथके पाण्याखालील जहाजाचा शोध लावतात. या टायटनमध्ये हे उकरण होते का ? असा सवाल निर्माण झाला आहे. जर ही यंत्रणा नसेल किंवा नादुरुस्त झाली असेल तर त्यांच्या शोध घेणे कठीण बनेल असे म्हटले जात आहे. बॅलास्ट सिस्टीममुळे पाणबुडी वरती येते ती यंत्रणा खराब झाली आहे का ? हे टायटॅनिक जहाजाचे अवशेष समुद्राच्या तळाशी खुपच खोलवर आहेत. तेथे जाऊन टायटन पाणबुडीचा शोध घेणे कठीण कार्य असल्याचे म्हटले जात आहे.