नवी दिल्ली | 19 जानेवारी 2024 : नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आलेले सयुंक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांचे फॅमिली ही जगातील सर्वात श्रीमंत फॅमिली आहे असे म्हटले जाते. त्यांच्या एकूण संपत्तीच्या आकड्यांनी तुमचे डोळे दीपतील. ब्लूमबर्गच्या worlds Richest families 2023 च्या यादी नाहयान कुटुंबाला पहिल्या क्रमांकावर स्थान दिले आहे. शेख मोहम्मद अबू धाबीचे 17 वे श्रीमंत प्रशासक आहेत.
दुबईच्या अल नाहयान रॉयल फॅमिलीचा निवास 4,078 कोटींच्या राजवाड्यात आहे. तो इतका मोठा आहे की त्यात अमेरिकेतील तीन पेंटागॉन सामावतील. या शाही फॅमिलीकडे स्वत:च्या मालकीची चार जेट विमाने आहेत. त्यांच्या मालकीचा फुटबॉल क्लब हा जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लब आहे.
अबू धाबीत सोन्याचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या कसर अल-वतन नावाच्या राष्ट्रपती भवनात ( महाल ) हा शाही परिवार रहातो. संयुक्त अरब अमिराती असलेल्या अनेक महालाहून हा सर्वात मोठा आहे. सुमारे 94 एकरावर पसरलेल्या या महालात 3,50,000 क्रिस्टल पासून तयार केलेले झुंबर आहे. तसेच या महालात अनेक किंमती वस्तूंचा खजाना आहे. संयुक्त अरब अमीरातीचे राष्ट्राध्य़क्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान ज्यांना MBZ नावाने देखील ओळखले जाते. ते या कुटुंबाचे प्रमुख आहेत, त्यांना 18 भाऊ आणि 11 बहिणी आहेत. त्यांना नऊ मुले आणि 18 नातवंडही आहेत.
अबू धाबीचे राष्ट्राध्यक्षाचे छोटे बंधू शेख हमद बिन हमदान अल नाहयान यांच्याकडे 700 हून अधिक कारचे कलेक्शन आहे. यात जगातील सर्वात मोठी SUV सह पाच बुगाटी वेरॉन, एक लेम्बोर्गिनी रेवेंटन, एक मर्सिडीज-बेंझ CLK GTR, एक फेरारी 599XX आणि एक मॅकलेरन MC12 चा समावेश आहे.
या शाही कुटुंबाकडे सुमारे जगातील सहा टक्के तेल भांडार, मॅंचेस्टर सिटी फुटबॉल क्लब आणि अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे शेअर आहेत. त्यांच्याकडे गायिका रिहानाचा ब्युटी ब्रॅंड फेंटीपासून इलॉन मस्कच्या स्पेस एक्सचे शेअर आहेत. राष्ट्राध्यक्षांचे बंधू तहनून बिन झायद अल नाहयान कुटुंबाच्या मुख्य गुंतवणूक कंपनीचे प्रमुख आहेत. जिची व्हॅल्यू गेल्या पाच वर्षांत सुमारे 28,000 टक्के वाढली आहे.
कंपनीचे मूल्य सध्या 235 अब्ज डॉलर आहे. दुबईच्या शाही परिवाराकडे संयुक्त अरब अमिराती तसेच पॅरिस, लंडन सह जगभर मालमत्ता आहेत. शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांना लंडनचा सर्वात श्रीमंत लॅंड लॉडर्स म्हटले जाते. लंडनमध्ये एक दोन नाही तर अनेक इमारती शेख यांच्या नावाने खरेदी केलेला आहे.
2015 मध्ये न्यूयॉर्करच्या एका बातमीनूसार दुबईच्या शाही कुटुंबाजवळ लंडनच्या शाही परिवाराइतकी संपत्ती होती. MBZ यांनी अबू धाबी युनायटेड ग्रुपने युकेची फूटबॉल टीम मॅंचेस्टर सिटीला 2,122 कोटीत खरेदी केले होते. कंपनीजवळ सिटी फुटबॉल ग्रुपचा 81 टक्के हिस्सा आहे. जे मॅंचेस्टर सिटी, मुंबई सिटी, मेलबर्न सिटी आणि न्यूयॉर्क सिटी फुटबॉल क्लबचे संचलन करते.