नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) अध्यक्ष डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी पुन्हा एका महामारीचे भविष्य वर्तविले आहे. मानवी जातीला एका विषाणूपासून धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला. कोरोनापेक्षा पण हा विषाणू ताकदवान असून त्यामुळे मानवाला मोठा धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात यापूर्वी पण कोरोनानंतर लागलीच अनेक महामारी लाटा येण्याची भाकितं करण्यात आली होती. पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनीच हा इशारा दिल्याने त्याच्याकडे आरोग्य खाते किती गंभीरतेने पाहते हे समोर येईलच.
काय दिला इशारा
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) अध्यक्ष डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी कोरोनापेक्षा अधिक प्रभावशाली, धोकादायक विषाणू हल्ला करणार असल्याचा इशारा दिला आहे. या विनाशकारी विषाणूमुळे जगातील 2 कोटी लोक मरतील, असा दावा त्यांनी केला आहे. द इंडिपेंडेंटने याविषयीचा रिपोर्ट दिला आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 महामारीपासून धोका नसल्याचा दावा नुकताच केला आहे.
कोविड हद्दपार नाही
WHO अध्यक्षांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानुसार, कोविड-19 महामारीपासून सध्या धोका नसला तरी ही कोरोना अजूनही समाप्त झालेला नाही. वार्षिक आरोग्य परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर त्यांची मते मांडली. तसेच येत्या काही दिवसांत कोरोनापेक्षा पण अधिक धोकादायक विषाणूचा प्रादूर्भाव होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.
जीविताला धोका
WHO चे अध्यक्ष डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांच्या मते, या महामारीला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. यामुळे मानवी जातीला मोठा धोका होऊ शकतो. ही महामारी अनेकांच्या जीविताला धोका ठरु शकते. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे बळ जाऊ शकतात. कोरोनापेक्षा पण हा विषाणू अधिक घातक आहे. जगाने या महामारीशी दोन हात करण्यासाठी सज्ज असणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.
कोरोना हे जागतिक संकट
डब्ल्यूएचओने काही आजारांची प्राथमिक माहिती गोळा केली आहे. हे आजार लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहेत. डेली मेलने याविषयी माहिती दिली आहे. या आजारांवर वेळीच तोडगा शोधला नाही. त्यावर औषध शोधले नाही तर मोठा धोका उत्पन्न होण्याची भीती डब्ल्यूएचओने व्यक्त केली आहे. तसेच कोरोना हे या शतकातील सर्वात मोठे संकट होते. त्याच्याविरोधात लढण्यासाठी जगाला पुरेशा अवधी मिळाला नाही. पण आता त्याचा धोका कमी झाल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
कोरोनात 70 लाख जणांचा मृत्यू
कोरोना संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरला. या महामारीने जगाला बदलवून टाकले. या विषाणूमुळे जगभरात 70 लाख लोकांचा मृत्यू ओढावले. पण आकडे याहून अधिक असण्याची शक्यता अधिक आहे. एका अंदाजनुसार हा आकडा दोन कोटींच्या घरात असल्याचा दावा WHO ने केला आहे.