चीन आणि पाकिस्तानच्या उरात भरली धडकी, दोन मोठ्या लोकशाही राष्ट्रात महत्वाचे संरक्षण करार, बायडन आणि मोदी यांच्या बैठकीवर जगाची नजर

| Updated on: Jun 22, 2023 | 3:52 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. भारताचे अमेरिकेशी महत्वाचे संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. या कराराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. काय आहेत या करारात

चीन आणि पाकिस्तानच्या उरात भरली धडकी, दोन मोठ्या लोकशाही राष्ट्रात महत्वाचे संरक्षण करार, बायडन आणि मोदी यांच्या बैठकीवर जगाची नजर
Tejas Jet fighter
Image Credit source: socialmedia
Follow us on

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( JOE BIDEN ) यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेच्या दौऱ्यावर ( PM MODI US VISIT ) आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी वॉशिग्टन येथील त्यांच्या व्हाईट हाऊस या निवासस्थानी जोरदार स्वागत केले आहे. परंतू आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्वीपक्षीय संरक्षण करारावर आज सह्या होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात कोणते मोठे करार होणार आहेत ? पाहूयात

जेट इंजिनचा करार – अमेरिकन कंपनी जीई हीचा भारतीय कंपनी एचएएलशी जेट इंजिनाचे तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताचे स्वदेशी बनावटीच्या हलके लढाऊ जेट फायटर विमान तेजस आणि अन्य विमानांना हे इंजिन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे घरगुती लढाऊ विमानाचे उत्पन्न वाढणार आहे.

MQ9 रीपर-प्रिडेटर ड्रोन – या ड्रोन विमानाची मारक क्षमता मोठी आहे. अशी 30 ड्रोन विमानांना भारतीय जनरल एटॉमिक्स खरेदी करण्याच्या विचारात आहे, या तीन अब्ज डॉलरच्या करारास यापूर्वीच मंजूरी मिळाली आहे. आता त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

अमेरिकेची त्यांची बोईंग सुपर हॉर्नेट आणि F21 या विमानाच्या नेव्ही आणि एअरफोर्स आवृत्त्या भारताला देण्याची योजना आहे. अमेरिका चीनला शह देण्यासाठी भारताशी जवळीक वाढवित आहे. तसेच भारताने रशियावर जास्त विसंबून राहू नये अशी अमेरिकेची इच्छा आहे.

एस – 400 मिसाईल सिस्टीम करार रखडला

युक्रेन युद्धामुळे भारताचा रशियाशी एस-400 एंटी मिसाईल सिस्टीमचा खरेदीचा सौदा रखडला आहे. या युक्रेन युद्धामुळे हे करार रखडले आहेत. त्यामुळे भारत आणिअमेरिकेतील खुल्या बाजारामुळे दोन्ही देशांत विश्वासाचे वातावरण तयार होईल. त्यामुळे भारताची संरक्षण ताकदीत वाढ होणार आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांना या संरक्षण करारामुळे धडा मिळणार आहे.