न्यूयॉर्क : जुन्या जमान्यात घर मुलगी जन्माला येणं म्हणजे कमीपणाचे लक्षण मानलं जात होतं. हरियाणा आणि राजपुतान्यामध्ये तर मुलगी जन्माला येताच तिला जन्म देणार्या मातेनेच मुलीच्या नरड्याला नख लावण्याची पध्दत होती असे म्हणतात. इथले काही लोक तर मिशावर ताव मारून आपल्या घराण्यात गेल्या कित्येक पिढ्यात मुलगी जन्माला आलेली नाही अशी बढाईही मारत. पण, काळ बदलत गेला आणि ‘मुलगी झाली, लक्ष्मी आली’ अशी म्हण रूढ झाली. मात्र, अमेरिकेतील एक असं कुटुंब होतं कि त्याला आपल्या घराण्यात एक मुलगी तरी जन्माला यावी असं वाटतं होतं. परंतु, नेहमी त्यांचे दुर्दैव आड यायचं.
हे कुटूंब अमेरिकेत रहात आहे. सुनेला मुलगी झाल्याने कळले तेव्हा त्या कुटुंबाला एकच आनंद झाला. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य आनंदाने ओरडू लागले. अखेर, मुलगी झाली ही गोड बातमी ते तब्बल 138 वर्षांनंतर ऐकत होते. पहाता पहाता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण शहर त्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी झाले.
मिशिगनमध्ये राहणाऱ्या कॅरोलिन आणि अँड्र्यू क्लार्क यांच्या घरी या छोट्या लाल परीचे आगमन झालं आणि तिने या घरात शतकानुशतके सुरू असलेला मुलगी न होण्याचा विक्रम मोडला. कॅरोलिन आणि अँड्र्यू यांनी मुलीचे नाव ऑड्रे असे ठेवले आहे. त्यांना आधीच चार वर्षांचा मुलगा आहे. यानंतर आपल्या घरी आणखी एक लहानग्याचे आगमन होणार असल्याची चाहूल त्यांना लागली. गरोदर असल्याचे समजल्यानंतर मुलगा की मुलगी याकडे त्यांनी लक्ष दिले नाही.
सप्टेंबर 2022 मध्ये कुटुंबातील सदस्य एकत्र आले. त्यावेळी चाचणीत आपल्या कुटुंबात मुलगी जन्माला येणार असे कळले. ती एका मुलीचे पालक होणार आहे, तेव्हा तिचा विश्वास बसत नव्हता. 2021 मध्ये कॅरोलिनचा गर्भपात झाला होता. त्यामुळे क्लार्क कुटुंब कॅरोलिनची अधिक काळजी घेऊ लागले.
कॅरोलिनने अँड्र्यूला डेट करत होती तेव्हा तिला समजले की, 1885 नंतर म्हणजेच सुमारे 130 वर्षांहून अधिक काळ या कुटुंबात एकही मुलगी जन्माला आली नाही. कॅरोलिनचा यावर विश्वास बसला नाही. तिला मुलगी किंवा मुलगा असे काही विशिष्ट नको होते. फक्त एक निरोगी मूल हवे होते. पण, जेव्हा ती कटुंबात वावरू लागली तेव्हा तिचा या गोष्टीवर विश्वास बसला.
अखेर, तिने त्या लाल परीला जन्म दिला. अनेक शतकांनंतर त्या कुटुंबात मुलगी जन्माला आली. कुटुंबात मुलगी झाल्याची बातमी पहिल्यांदाच कोणी ऐकली. हा आनंदाचा प्रसंग होता. प्रत्येक सदस्याला खूप आनंद झाला. ते आनंदाने ओरडू लागले. या लाल परीच्या आगमनाने जणू काही कुटुंबाची झोळी आनंदाने भरली होती.