हे आहेत जगातले सर्वात दहा गरीब देश, जगण्यासाठी येथे रोजचा संघर्ष

| Updated on: Jun 22, 2024 | 6:54 PM

भारताची अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. नुकतीच आपली अर्थव्यवस्था ग्रेट ब्रिटनच्या बरोबरीला आली आहे. सध्या आपण जगातील पाच प्रमुख अर्थव्यवस्थेत आहोत. तरी ग्रेट ब्रिटन येथील लोकसंख्या अत्यंत कमी असल्याने तेथील नागरीकांचे दरडोई उत्पन्न आपल्याहून कितीतरी पट जादा आहे. तसेच जगात अनेक देश खूपच गरीब आहेत, ते कोणते पाहूयात....

हे आहेत जगातले सर्वात दहा गरीब देश, जगण्यासाठी येथे रोजचा संघर्ष
Top Ten Poorest Country in the World
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

जगात अनेक देश अजूनही गरीब आहेत. अलिकडे या देशांची एक यादी जाहीर झाली आहे. या यादीत जगातील सर्वात 10 गरीब देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी प्रति व्यक्ती सकल घरगुती उत्पादन ( GDP Per capital ) च्या आधारे काढलेले आहे. चला तर पाहूयात जगातील सर्वात गरीब देश कोणते ? गरीबी ही समस्या अजूनही दूर झालेली नाही. जगात अनेक देश अद्यापही गरीब म्हणून गणले जात आहेत. हे लोक रोजचा जगण्याचा संघर्ष करीत आहे. साल 2024 मध्ये अनेक देशांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागला. तर जीडीपीच्या आधारे जगात सर्वात दहा गरीब देश पाहूयात कोणते आहेत ते ?

दक्षिण सूदान –

जगातील सर्वात गरीब देशात सुदानच नंबर पहिला येतो. हा देश अनेक दशकांहून अन्न, वस्र आणि निवारा देखील जनतेला पुरवू शकत नाही.अनेक आर्थिक अडचणी सापडलेला या देशातील प्रति व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न केवळ 492 डॉलर म्हणजे केवळ 41,173 रुपये इतके आहे.

बुरुंडी –

गरीबीच्या बाबतीत पूर्व आफ्रीकेतील हा बुरुंडी नावाचा देश कृषीप्रधान आहे. येथे राजकीय अस्थिर परिस्थिती आणि वांशिक संघर्षांने विकास झालेला नाही. येथील प्रति व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 936 डॉलर म्हणजे 78,250 रुपये आहे.

मध्य आफ्रीकन गणराज्य –

गरीब देशांच्या यादीत मध्य आफ्रीकी गणराज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. हीरे आणि लाकूड अशा अनेक नैसर्गिक संपदे नंतरही हा देश अस्थिरता, गरीबी आणि अविकसितपणाशी संघर्ष करीत आहे. येथील वार्षिक प्रति व्यक्ती उत्पन्न 1,140 डॉलर म्हणजे 95,261 रुपये आहे.

कांगो रिपब्लिक गणराज्य –

नैसर्गिक साधन संपदा असूनही हा देश गरीब देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. हा देश आर्थिक संकटात आहे. राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार आणि कुशासनाने या देशाचा समावेश गरीब देशात झाला आहे. या देशाचे प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1,570 डॉलर म्हणजेच 1,31,193 रुपये आहे.

मोजाम्बिक –

कमी साक्षरता पायाभूत सविधांचे घसरते प्रमाण अनेकदा येणारी नैसर्गिक संकटे त्यामुळे या देशाला आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हा देश जगातला पाचवा सर्वात गरीब देश आहे. येथे प्रति व्यक्ती वार्षिक कमाई 1,650 डॉलर आहे. म्हणजे 1,37,878 रुपये इतकी आहे.
मलावी –
कृषी उत्पन्नावर निर्भर असलेला मलावी जगातला सहाव्या क्रमांकाचा गरीब देश आहे. शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि पायाभूत सुविधा याचे मर्यादीत प्रमाण असल्याने या देशाला गरीबीने घेरलेले आहे. येथील प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1,710 डॉलर म्हणजे 1,42,892 रुपये आहे.

नायझर –

गरीब देशांच्या यादीत नायझर हा देश सातव्या क्रमांकावर आहे. शिक्षणाचे कमी प्रमाण, वैद्यकीय सेवेचा उडालेला बोजवारा यामुळे हा देश गरीबीत पिचला आहे. येथील प्रति व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 1,730 डॉलर म्हणजे 1,44,563 रुपये आहे.

चाड –

चाड नावाच्या देशाची अर्थव्यवस्था तेल निर्यातीवर अवलंबून आहे. तरीही हा देश गरीबीशी लढत आहे. त्यामुळे हा देश गरीबांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. येथील जनतेचे प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1,860 डॉलर म्हणजे 1,55,427 रुपये आहे.

लायबेरीया –

आयर्न आणि रबराचे नैसर्गिक उत्पादन असलेला लायबेरीया हा गरीब देशांच्या यादीत 9 व्या स्थानावर आहे. यादवी युद्ध, भ्रष्टाचार आणि कमजोर संस्था यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांचे प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न 1,880 डॉलर म्हणजेच 1,57, 098 रुपये इतके आहे.

मादागास्कर –

गरीब देशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर मादागास्कर देशाचे नाव आले आहे. येथील अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे. येथील लोकसंख्या शेती करते. येथील प्रति व्यक्ती वार्षिक उत्पादन 1,990 डॉलर म्हणजे 1,66, 290 रुपये इतके कमी आहे.