Third World War: जग तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ? बायडेनचे वक्तव्य चिंतेत टाकणारे

| Updated on: Oct 07, 2022 | 11:02 PM

पुतीन यांनी दिलेली अण्वस्त्र वापरण्याची धमकी हा गमतीचा विषय नसून जग एका मोठ्या संकटाकडे कूच करत असल्याची चिंता अमेरिकेचे अध्यक्ष जी बायडेन यांनी व्यक्त केली आहे.

Third World War: जग तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ? बायडेनचे वक्तव्य चिंतेत टाकणारे
आण्विक हल्ला
Image Credit source: Social Media
Follow us on

न्यूयॉर्क, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी युक्रेन युद्धाबाबत (World War) आपली भीती व्यक्त केली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये अण्वस्त्रे (Nuclear Weapon) वापरण्याची धमकी दिल्याने जग एका महायुद्धाच्या उंबरठयावर आले आहे, असे जो बायडेन म्हणाले. क्युबामध्ये सोव्हिएत क्षेपणास्त्रांच्या तैनातीवरून शीतयुद्धाच्या काळातील तणावानंतर प्रथमच जागतिक युद्धाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. बायडेन  यांनी म्हटले आहे की, पराभवाच्या भीतीने पुतिन युक्रेनमध्ये अण्वस्त्रांचा वापर करू शकतात.

1962 नंतरची सर्वात चिंताजनक परिस्थिती

तत्कालीन सोव्हिएत नेते निकिता ख्रुश्चेव्ह यांनी 1962 मध्ये अमेरिकेच्या सीमेजवळ क्यूबामध्ये क्षेपणास्त्रे तैनात करण्याचा निर्णय घेतल्यापासून हा धोका सर्वात गंभीर आहे. या क्षेपणास्त्र तैनातीच्या निषेधार्थ अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी महायुद्ध सुरू होण्याचा इशारा दिला होता. नंतर तो धोका टळला होता.

आण्विक शस्त्रे वापरण्याचा धोका

बायडेन म्हणाले, क्युबा क्षेपणास्त्र संकटानंतर प्रथमच जगाला अण्वस्त्र वापरण्याचा धोका जाणवत आहे. परिस्थिती अशीच बिघडत राहिल्यास हा धोका प्रत्यक्षात येऊ शकतो. रणनीतिक अण्वस्त्रे किंवा जैविक शस्त्रे किंवा रासायनिक शस्त्रे वापरण्याबाबत पुतिन यांचे विधान हल्ल्यात घेण्यासारखे नसल्याचे बायडेन  म्हणाले.

हे सुद्धा वाचा

 

सध्याची परिस्थिती काय?

युक्रेनमधील रशियन सैन्य जाणीवपूर्वक विनाशकारी शस्त्रे वापरण्यासाठी परिस्थिती निर्माण करत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सामरिक अण्वस्त्रे हे कमी क्षमतेचे अण्वस्त्र आहे ज्याची श्रेणी 100 चौरस किलोमीटरपेक्षा कमी आहे. रशिया आणि अमेरिकेकडे अशा अण्वस्त्रांचा मोठा साठा आहे.

युक्रेनने रशियन सैन्याकडून 500 चौरस किमी जमीन घेतली हिसकावून

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की त्यांच्या सैन्याने या आठवड्यात रशियन सैन्याकडून 500 चौरस किलोमीटरचा प्रदेश परत मिळविला आहे. युक्रेनचे सैन्य डोन्स्क, खेरसन आणि झापोरिझिया येथेही लढत आहेत, हा भाग रशियाने ताब्यात घेतला होता.