जगातील टॉप 10 सर्वाधिक वेतन मिळणारे राजकीय नेते, अमेरिका, भारत आणि ब्रिटन नाहीत टॉपमध्ये !

| Updated on: Jul 10, 2024 | 8:29 PM

जगातील टॉपच्या देशातील नेत्यांचे प्रसिद्धीचे वलय मोठे असते. परंतू त्यांना मानधन म्हणून वेतन दिले जाते हे कोणालाही माहिती नसते. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या नेत्यामध्ये पाश्चात्य नव्हे तर आशियाई देश पुढे आहेत.

जगातील टॉप 10 सर्वाधिक वेतन मिळणारे राजकीय नेते, अमेरिका, भारत आणि ब्रिटन नाहीत टॉपमध्ये !
Lawrence Wong, Viola Amherd, John Lee Ka-chiu
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

जगभरातील ताकदवान राजकीय नेत्यांमध्ये सर्वात जास्त वेतन मिळणाऱ्या नेत्यांची माहिती मिळाली आहे. या यादीत अमेरीका आणि युरोपचे नेते नाहीत. जगातील सगळ्यात जास्तीत जास्त वेतन मिळणाऱ्या देशाची यादी जाहीर झाली आहे. या टॉप टेनमधील नेत्यांचे वेतन जरी बड्या कंपन्यांच्या सीईओपेक्षा कमी आहे. जे नेते टॉपवर आहेत त्यात अमेरिका आणि युरोपच्या एकाही नेत्याचा समावेश नसल्याचे उघडकिस आले आहे.

10 – न्युझीलंड – न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन या यादी 10 व्या क्रमांवर आहे.त्यांना वार्षिक 2.88 डॉलर ( सुमारे 2.40 कोटी ) वेतन मिळते.

9 – कॅनडा – या यादीत नवव्या क्रमांकावर कॅनडाचे पंतप्रधान जस्ट्रीन डुडो आहे, त्यांना दरवर्षी 2.92 लाख अमेरिकी डॉलर ( 2.43 कोटी रुपये ) वेतनाच्या रुपात मानधन दिले जाते.

8 – ऑस्ट्रीया – युरोपी देश ऑस्ट्रीयाचे चान्सलर कार्ल नेहमर यांचा आठवा क्रमांक आहे. दरवर्षी वेतन म्हणून त्यांना 3.64 लाख अमेरिकन डॉलर( 3.03 कोटी रुपये ) मिळतात. ते कमाईच्या बाबतीत सातव्या कम्राकांवर आहेत.

7 – युरोपियन यूनियन – युरोपीय देशांच्या संघाची प्रमुख उर्सुला वॉन डार यांची कमाई देखील जबरदस्त आहे. त्यांना दर वर्षी 3.64 लाख डॉलर ( 3.03 कोटी रुपये )

6 – जर्मनी – युरोपातील सर्वात श्रीमंत देश जर्मनी आपल्या नेत्यांनी सॅलरी देण्यातही पुढे आहे. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कॉल्ज या दर वर्षी वेतन म्हणून 3.67 लाख अमेरिकन डॉलर ( 3.06 कोटी रुपये ) ते जगात सहाव्या क्रमांकवर आहेत.

5 – ऑस्ट्रेलिया – प्रशांत महासागरातील ऑस्टेलिया या देशाच्या पंपप्रधान एंथनी अल्बनीज वेतनाच्या प्रकणात पाचव्या क्रमांकावर आहेत, त्यांना दरवर्षी वेतन म्हणून 3.90 लाख अमेरिकन डॉलर ( 3.25 कोटी रुपये ) मिळतात

4 – अमेरिका – जगातील सर्वात ताकदवान देश अमेरिका आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना जरी ताकदवान म्हटले जाते. परंत वेतनात ते चौथ्या क्रमांकावर आहेत, अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाला वार्षिक 4 लाख डॉलर म्हणजे ( 3.34 कोटी रु. ) मिळतात.

3 -स्वित्झरर्लंड – जगातील सर्वात जास्त वेतन मिळविणाऱ्या नेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर युरोपातील सर्वांत सुंदर देश स्वित्झरर्लंडच्या राष्ट्राध्यक्षा वायोला एमहर्ड आहेत. त्यांना दरवर्षी वेतन म्हणून 5.30 लाख अमेरिकन डॉलर ( 4.42 कोटी रु. ) मिळतात.

2- हॉंगकॉंग – चीनचे नियंत्रण असलेला हा देश असला तरी याचे चीफ एक्झुकेटिव्ह म्हणजे प्रशासक जॉन ली -चिऊ वेतन मिळण्यात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.त्यांना दरवर्षी 6.59 लाख अमेरिकन डॉलर ( 5.5 कोटी रु.) वेतन मिळते. हा आकडा 2022आहे.यात आता वाढ देखील झाले आहे.

1-सिंगापूर – जगात सर्वात जास्त वेतन सिंगापूरच्या पंतप्रधान लॉरेंस वॉन्ग सर्वात जास्त वेतन घेणारे राजकीय नेते आहेत. त्यांना दरवर्षी 16.1 लाख डॉलर म्हणजे 13.44 कोटी रुपये वेतन मिळते.त्यांच्या आसपास देखील कोणत्या नेत्याचे वेतन पोहचत नाही.दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याच्या तुलनेत त्यांचे वेतन तीन पट जादा आहे.