लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे तोशाखान प्रकरणात आपली अटक टळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. त्या प्रकरणावरूनच पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी सोमवारी दावा केला की माजी पंतप्रधान इम्रान खान हे अटकेपासून वाचण्यासाठी एक दिवस अगोदर त्यांच्या लाहोर निवासस्थानाच्या भिंतीवरून उडी मारून शेजारच्या घरात पळून गेले होते. इस्लामाबाद पोलिसांची टीम रविवारी खान यांना अटक करण्यासाठी लाहोरला पोहोचल्यानंतर सनाउल्लाहकडून वेगळी माहिती आली.
त्यानंतर त्यांना अटक न करताच ते पुन्हा माघारी परतले.खान यांच्या कायदेशीर पथकाने पोलिसांना आश्वासन दिले होते की तो 7 मार्च रोजी त्यांच्याकडून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
काल इम्रान खान यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला नाट्यमय घडामोडींचा सामना करावा लागला होता अशी अफवा पसरली आहे.यावेळी खान हे भिंतीवरून उडी मारून त्याच्या शेजाऱ्याच्या घरी पळून गेल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर काही वेळातच त्यांनी भाषणही केले.या अटकेबाबत त्यांनी सांगितले आहे की, जर पोलिसांना माजी पंतप्रधानांना अटक करायचे असेल तर आता राबवत असलेली ही रणनीती योग्य नाही असंही त्यांच्या मंत्र्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
इस्लामाबादमधील जिल्हा न्यायालयाने सोमवारी तोशाखाना प्रकरणात हजर न राहिल्याबद्दल माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट मागे घेण्यास नकार दिला होता.
तर इम्रान खान यांच्यावर तोशाखान्यात कमी किमतीत भेटवस्तू तत्कालीन पंतप्रधान म्हणून मिळालेल्या महागड्या घड्याळासह खरेदी केल्याचा आणि नंतर नफा कमावण्यासाठी विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
तोशाखाना हा पाकिस्तानमधील एक सरकारी विभाग आहे, जिथे इतर देशांच्या सरकारच्या प्रमुखांनी, राष्ट्रपती-पंतप्रधान, संसद सदस्य, नोकरशहा आणि अधिकारी यांना परदेशी व्यक्तींनी दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख खान यांनी इस्लामाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून खटल्याच्या सुनावणीत हजर न राहिल्याबद्दल 28 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या वॉरंटला आव्हान दिले होते.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी दिवसाआधी निकाल राखून ठेवला होता आणि नंतर या प्रकरणाच्या सुनावणीनंतर तो जाहीरही केला होता.