ना ट्रॅफीक, ना दंडाची पावती असती? जगात कुठून आले सिग्नल? जाणून ह्या

| Updated on: Dec 14, 2024 | 8:08 PM

ट्रॅफिक लाईट हा आपल्या सर्वांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. रस्त्यावर सुरक्षित वाहन चालविण्यासाठीही हे आवश्यक आहे. पण यामुळे चालानही कापले जाते. शेवटी हा ट्रॅफिक सिग्नल कोणी बनवला? ते जगात कोणी आणले याचा संपूर्ण तपशील वाचा.

ना ट्रॅफीक, ना दंडाची पावती असती? जगात कुठून आले सिग्नल? जाणून ह्या
Follow us on

लोकांच्या वाढत्या गरजांमुळे आज प्रत्येकाच्या घरात गाड्या आहेत. यामुळे प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक होत असते. त्यामुळे अनेक नागरिकांना या ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. यासाठी आज संपूर्ण जगात ट्रॅफिक सिग्नलचा वापर केला जातो. ज्यामुळे ट्रॅफिक हाताळणे सोपे झाले आहेत. मात्र यात जेव्हा तुमच्याकडून ट्रॅफिक नियम मोडल्याने चालान कट झाल्यावर अनेकदा आपल्या तोंडातून आपसूक बाहेर पडते की, शेवटी हा ट्रॅफिक सिग्नल कोणी बनवला? सिग्नल नसता तर चालान कट झालेच नसते. असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. तर आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत. शेवटी हा सिग्नल या जगात कुठून आला? कोणी निर्माण केला? हे सर्व जाणून घ्या.

जसजसे जग पुढे जात आहे. कालांतराने रस्त्यांवरील वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर ही वाहतूककोंडी होत आहे. ही अडचण टाळण्यासाठी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलची गरज अधिक भासू लागली आहे.

ट्रॅफिक सिग्नलची कल्पना?

ट्रॅफिक सिग्नलची कल्पना कुठून आली याचा विचार केला तर त्याची कहाणी १८६८ मध्ये सुरू झाली. ही कल्पना लंडनमधून आली जेव्हा तिथे घोडागाडी आणि गाड्या धावत असत. यामुळे तेथील रस्ते खचाखच भरले होते. त्यामुळे त्या रस्त्यांवरील माणसांना चालताना होणाऱ्या गर्दीने त्रास सहन करावा लागत होता. सर्वात गर्दीचे ठिकाण परिसर म्हणजे संसद चौक, वर्दळीचा भाग. त्यावेळी पोलिसांनाही वाहतुकीचे फारसे व्यवस्थापन करता आले नाही. या समस्येवर मात करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची कल्पना पुढे आली.

हे सुद्धा वाचा

पहिला ट्रॅफिक लाईट

१८६८ मध्ये लंडनच्या रेल्वे क्रॉसिंगवर गॅसवर चालणारा ट्रॅफिक लाईट बसवण्यात आल्या. या ट्रॅफिक लाईटमध्ये लाल आणि हिरवा असे दोनच रंग होते.

त्यात हिरवा रंगाचा लाईट दिसल्यास चालणे आणि लाला रंगाचा लाईट दिसल्यास थांबणे असे हे दोन रंग सिग्नल सूचित केले गेले. त्यात हा ट्रॅफिक लाईट त्यावेळी कोणत्याही पोलिसाकडून मॅन्युअली चालवला जात असे. मात्र यात अमेरिकेत ट्रॅफिक लाईटला लागण्यास थोडा उशीर झाला.

पहिली इलेक्ट्रिक लाईट

१९१२ मध्ये सॉल्ट लेक सिटी, युटा येथे पहिली इलेक्ट्रिक लाईट आली. तसेच पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक लाईट हा लेस्टर वायर या पोलीस कर्मचाऱ्याने तयार केला होता. ज्यात लाल आणि हिरव्या या दोन दिव्याचा समावेश होता. तर १९२० मध्ये ट्रॅफिक लाईटमध्ये पिवळ्या रंगाचा तिसरा रंग जोडण्यात आला. तेव्हापासून ट्रॅफिक सिग्नलमध्ये आपल्याला लाला हिरवा आणि पिवळा असे तीन ट्रॅफिक सिग्नल दिसतात, जे अजूनही सुरू आहेत.

भारतातील ट्रॅफिक लाइट्स

काळाच्या ओघात ट्रॅफिक लाईटमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यात नवे फीचर्स जोडण्यात आले होते. आजच्या काळात ट्रॅफिक लाईट वेगवेगळे संकेत देतात. भारतात ट्रॅफिक लाइट्सचा वापर विसाव्या शतकाच्या मध्यापासून सुरू झाला. सध्या भारतातील जवळपास सर्वच शहरांमध्ये ट्रॅफिक लाईटचा वापर केला जातो. त्यात या ट्रॅफिक लाईटचा कोणी उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला याचा दंड भरावा लागतो. यात देखील आता अनेक बदल झाले आहे. पहिले ट्रॅफिक पोलीस हवालदार गाडी थांबवून चालान कट करायचे मात्र आता डिजिटल माध्यमातून ट्रॅफिक सिग्नलच्या वर कॅमेरे लावण्यात आले ज्याने ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास त्या गाडीचा ऑनलाईन पद्धतीने चालान कट केला जातो.