एलॉन मस्क यांची क्रांतीकारी योजना, अवघ्या 30 मिनिटांत दिल्ली ते अमेरिका प्रवास करता येणार ?

| Updated on: Nov 17, 2024 | 2:29 PM

अब्जाधीश एलॉन मस्क यांची स्पेसएक्स खाजगी कंपनी आता प्रवासाच्या जुन्या संकल्पना बदलणार आहे. आता अंतराळ यानातून एका तासात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहचता येणार आहे.

एलॉन मस्क यांची क्रांतीकारी योजना, अवघ्या 30 मिनिटांत दिल्ली ते अमेरिका प्रवास करता येणार ?
Follow us on

सध्या एका देशातून दुसऱ्या देशाच्या कोणत्याही शहरात पोहचण्यासाठी विमानाने अनेक तास लागतात. परंतू एलॉन मस्क यांची स्पेसएक्स ही कंपनी  प्रवासाची पारंपारिक संकल्पना बदलून टाकणार आहे. कंपनी एका क्रांतीकारी प्रकल्पावर काम करीत आहे. या प्रकल्पाला यश आले तर जगातील कोणत्याही प्रमुख शहरात एका तासात पोहचणे शक्य होणार आहे. या महत्वाचा प्रकल्पावर स्टारशिप काम करीत आहे.स्टारशिप हे स्टेनलेस स्टीलने तयार केलेले एक 395 फूटाच स्पेसक्राफ्ट आहे.

अब्जाधीश एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी ( DOGE ) चे नेतृत्व करण्यासाठी तयार आहे. स्टारशिप रॉकेटद्वारे पृथ्वी ते पृथ्वी स्पेस ट्रॅव्हल करण्याची आपली महत्वाकांक्षी योजना अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्याने फलद्रुप होण्याची शक्यता वाढल्याचे अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. डेली मेल यांच्या बातमीनुसार सुमारे एका दशकापूर्वी पृथ्वीवरील सर्वात ताकदवान रॉकेट स्टारशिपमध्ये 1,000 प्रवासी अंतराळात प्रवास करु शकणार आहेत. अंतराळाच्या अंधारात जाण्याऐवजी हे स्टारशिप पृथ्वीच्या वरती समांतर उडून एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणार आहे.

कुठे किती मिनिटांत पोहचता येणार

स्टारशिप प्रवाशांना लॉसएंजिल्स ते टोरंटो 24 मिनिटांत, लंडन ते न्यूयॉर्क 29 मिनिटांत, दिल्ली ते सॅन फ्रांसिस्को 30 मिनिटांत, आणि न्यूयॉर्क ते शांघाई 39 मिनिटांत पोहचविणार आहे. परंतू प्रवाशांना प्रवास करताना जी-फोर्सचा करावा लागणार आहे. तसेच प्रवासा दरम्यान कमी गुरुत्वाकर्षणाची स्थिती देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी सीट बेल्ट बांधावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

एक्सवरीलपोस्ट चर्चेत

‘स्पेसएक्स’ च्या योजनेबद्दल एका युजरने ( @ajtourville ) एक्सवर एक पोस्ट केलेली आहे. त्यात अर्थ टु अर्थ कन्सेप्टचा एक प्रमोशन व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. या क्रांतीकारी प्रकल्पाला ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात फेडरल एव्हीएशन एडमिनिस्ट्रेशनची (FAA) मंजूरी मिळू शकते. यावर एका युजरने यावर प्रतिक्रीया लिहीताना ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर स्पेसएक्सच्या स्टारशिप अर्थ टू अर्थ प्रोजेक्टला मंजूरी मिळू शकते. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात एका तासांहून कमी वेळेत पोहचणे शक्य होणार आहे. या प्रतिक्रीया एलॉन मस्क यांनी हे शक्य आहे असे उत्तर दिलेले आहे.