मार्डिनः तुर्कस्थानमध्ये (Turkey) दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातामुळे मोठी खबळबळ माजली आहे. या अपघातांमध्ये 32 जणांचा मृत्यू झाला असून 52 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जो पहिला अपघात झाला आहे तो गझियानटेप (Gaziantep) येथे घडला असून प्रवाशी भरलेल्या बसचा हा अपघात झाला आहे. त्या अपघातात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचवेळी, दुसरा अपघात हा मार्डिन शहरात झाला असून ट्रकवरचा चालकाचा ताबा सुटून अनेक लोकांना या ट्रकने (Truck Accident) चिरडले, या अपघातात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही अपघातात अनेक जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून भरधाव ट्रकने 32 जणांना चिरडून ठार केल्याने अनेक जणांना हा धक्का बसला आहे.
▶️ A truck ploughed into a crowd near a filling station in the Derik district of Mardin in Turkey on August 20, 2022, killing 16 people and injuring 29.
?At Least 32 Killed in Turkey in Separate Crashes at Two Sites https://t.co/96CcSev3kk pic.twitter.com/9eCLL77bCk
— Voice of America (@VOANews) August 21, 2022
गझियानटेपचे प्रादेशिक गव्हर्नर दावूत गुल यांनी अपघाताविषयी सांगताना ते म्हणाले की, रस्त्यावरुन खाली दरीत एक बस कोसळल्याने आपत्कालीन कर्मचारी आणि पत्रकारांसह 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जेव्हा अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि इतर मदतनीस अपघाताच्या ठिकाणी मदत करत होते, त्याचवेळी दुसरी बस 200 मीटर मागे कोसळली. त्यामुळे मदत करणासाठी खाली थांबलेल्या मदतकार्याच्या टीमचे सदस्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
बस अपघात झाला त्याच वेली मार्डिनपासून 250 किमीवर एका ब्रेक फेल झालेला ट्रक गर्दीच्या ठिकाणी घुसल्याने 16 जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी या अपघाताविषयी बोलताना सांगितले की,दुसऱ्या अपघातात 29 जण जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.