मुंबई : इलॉन मस्क (Elon Musk) मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरसोबतचा (Twitter) करार शेवटच्या टप्प्यात असतानाच तो अडकला आहे. मस्कला कायदेशीर अडचणींचा आता सामना करावा लागणार आहे. मस्क यांनी शनिवारी ट्विट (Tweet) करून याबाबत माहिती दिली आहे. तो म्हणाला की ट्विटरच्या कायदेशीर टीमने त्याच्यावर नॉन-डिस्कलोजर कराराचे (NDA agreement) उल्लंघन केल्याचा आरोप माझ्यावर लावण्यात आला आहे.’ मस्कच्या या ट्विटनंतर जगभरातल्या नजरा ट्विटरकडे वळल्या आहेत. मस्कने ट्विट केले, “ट्विटरच्या कायदेशीर टीमनं कळवलं की मी बोट चेक नमुन्याचा आकार 100 असल्याचं उघड करून नॉन-डिक्लोजर कराराचा भंग केला आहे.” इलॉन मस्क यांनी अलीकडेच सांगितलं की, जोपर्यंत बनावट खात्यांचा डेटा मिळत नाही तोपर्यंत हा करार स्थगित ठेवण्यात आला आहे. मस्कच्या ट्विटर डीलला काही काळ स्थगिती दिल्याची माहिती समोर आल्यानंतर ट्विटरच्या स्टॉकमध्ये जवळपास 10 टक्के घसरण झाली आहे. मस्कने काही दिवसांपूर्वी ट्विटरला 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार केला होता.
Twitter deal temporarily on hold pending details supporting calculation that spam/fake accounts do indeed represent less than 5% of usershttps://t.co/Y2t0QMuuyn
हे सुद्धा वाचा— Elon Musk (@elonmusk) May 13, 2022
एका फाइलिंगमध्ये Twitter नं म्हटलंय की, ‘2022 च्या पहिल्या तिमाही कमाई केलेल्या सक्रिय वापरकर्त्यांमध्ये (mDAUs) स्पॅम खात्यांची (बॉट्स) संख्या 5 टक्क्यांपेक्षा कमी होती. कंपनीनं असंही म्हटलंय की हा केवळ अंदाज आहे आणि स्पॅम खात्यांची संख्या जास्त असू शकते. यानंतर मस्क म्हणाले होते की, ‘ट्विटरवरील स्पॅम किंवा बनावट खाती खरोखर 5 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. त्याच्या अचूक गणनाचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. जोपर्यंत डेटा मिळत नाही तोपर्यंत करार स्थगित ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
To find out, my team will do a random sample of 100 followers of @twitter.
I invite others to repeat the same process and see what they discover …
— Elon Musk (@elonmusk) May 14, 2022
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची घोषणा केली होती. या वर्षी हा करार पूर्ण होईल, असे सांगितले जात होते. त्यानंतर ट्विटरवर इलॉनचे पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे ते थांबवण्यात आले आहे. एलन मस्क यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडिया कंपनी ट्विटरच्या शेअर्समध्ये 20 टक्के घसरण झाली होती. पहिल्या तिमाहीत कमाई केलेल्या सक्रिय वापरकर्त्यांपैकी 5 टक्के पेक्षा कमी खोट्या किंवा स्पॅम खाती आहेत. मात्र, सध्याच्या हलचाली पाहता ट्विटरमध्ये सध्या तरी बरंच काही बिघडल्याचं दिसतंय.