ब्रिटन, काळ बदलला आहे, आता लोक कुठेही जाण्यासाठी बस, रिक्षा किंवा इतर कोणत्याही वाहनाची वाट पाहत नाहीत. थेट उबेर किंवा ओला बुक करतात आणि सुखद प्रवास करतात. असाच सुखद प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीने ऑनलाईन टॅक्सी (Online Taxi) बुक केली. अवघ्या सहा किलोमीटरचा (6 KM Bill) प्रवास झाल्यानंतर त्याने ड्रायव्हरला बिल विचारले तर ड्रायव्हर आणि त्या व्यक्तीने कपाळावर हातच मारला! त्याचे कारण म्हणजे बिलाची रक्कम थोडी थोडकी नाही तर तब्बल 32 लाख रुपये होती. विश्वास बसत नसला तरी ही घटना खरी आहे.
हे आश्चर्यकारक प्रकरण ब्रिटनमधून समोर आले आहे. एका 22 वर्षीय ऑलिव्हर कॅप्लानने ऑफिस ते पबपर्यंत उबेर कॅब बुक केली. हे पैसे त्याच्या अकाऊंटमधून थेट कापल्या जाणार होते. त्याने सहज कॅब ड्रायव्हरला बिलाची रक्कम विचारली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण टॅक्सीचे बिल थोडेथोडके नव्हे तर तब्बल भारतीय मुद्रेत 32 लाख इतके आले.
एवढे जास्त बिल पाहून ऑलिव्हरने लगेच कस्टमर केअरला फोन करून या प्रकरणाचा खुलासा करण्यास सांगितले, एवढं जास्त बिल पाहून कस्टमर केअर कर्मचारीही आश्चर्यचकित झाले पण जेव्हा त्यांना त्यामागचे खरे कारण कळले हे कळल्यावर त्यांनी ही समस्या सोडवली.
घडले असे की ऑलिव्हर मँचेस्टर येथे जाणार होता परंतु त्याने चुकून ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथे त्याचे ड्रॉप लोकेशन टाकले. ज्याचे अंतर सुमारे 16000 किमी आहे आणि म्हणूनच उबरने त्याच्यावर 32 लाखांचे फाडले.
ऑलिव्हरने प्रश्न केला आहे, की हे कसे शक्य आहे? कुठली टॅक्सी मला जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या सोडणार होती? मी खरोखर भाग्यवान आहे की माझ्या खात्यात इतके पैसे नव्हते नाहीतर मला स्वतःच्या पैशासाठी त्यांच्या मागे धावावे लागले असते. मात्र, याबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, ऑलिव्हरने तक्रार दाखल करताच आम्ही तातडीने या प्रकरणाची चौकशी करून समस्या सोडवली.