नवी दिल्लीः ब्रिटनने या वर्षी 3 पंतप्रधानांचा कार्यकाळ पाहिला आहे. राजकीय आणि आर्थिक संकटामुळे देशाची कमान वेगवेगळ्या व्यक्तींच्या हातात गेल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. ब्रिटनच्या या राजकारणाचा परिणाम फक्त ब्रिटनवरच झाला नाही असं नाही तर त्याचा भारतावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. भारत आणि ब्रिटनमधील (Britain) मुक्त-व्यापार करार (Free-Trade Agreement) यंदाच्या दिवाळीपर्यंत पूर्ण होणार होता.
मात्र तेथील देशांतर्गत राजकारण इतर काही गोष्टीमध्ये अडकल्याने जानेवारीपासून सुरू झालेली मुक्त व्यापार कराराची ही प्रक्रिया दिवाळीनंतरही पूर्ण होऊ शकली नाही.
मात्र आता ब्रिटनची कमान भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या हाती गेल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे ब्रिटनने आता भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याचे आता जाहीर केले आहे.
मुक्त व्यापार करार हा दोन्ही देशांसाठी फायदेशीर असल्याचे मत ब्रिटनचे आहे. त्यामुळे भारत आणि ब्रिटनने या वर्षी जानेवारीत एफटीएसाठी बोलणी सुरू केली होती.
दिवाळीपर्यंत या वाटाघाटीही पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र ब्रिटनमधील राजकीय पेचप्रसंग वाढले असल्याने व अनेक मुद्द्यांवर एकमत न झाल्याने मुक्त व्यापार करार होऊ शकला नाही.
पण आता ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव ग्रेग हँड् यांनी सांगितले की, आम्ही या संदर्भातील चर्चा पूर्ण केली आहे.
आणि आता लवकरच चर्चेच्या पुढील गोष्टींसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांनी सांगितले की, भारत एक ‘आर्थिक महासत्ता’ आहे. जो 2050 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती असणार आहे. असे गौरवोद्गगारही काढले आहे.
ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव ग्रेग हँड्स यांच्या मते, मुक्त व्याापार करारामुळे ब्रिटन आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंधही मजबूत होणार आहेत.
या करारामुळे आर्थिक वाढ आणि नोकऱ्यांमध्येही वाढ होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
ब्रिटनमधील राजकीय स्थिरता आता मुक्त व्यापार करार करण्याच्या प्रक्रियेला चालना दिली जाणार आहे. त्यामुळे 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊ शकणार आहे असंही त्यांनी म्हटले आहे.