मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेर विसर्जित करा, वडिलांची विचित्र इच्छा, मुलं म्हणाली..

| Updated on: Feb 28, 2021 | 7:46 AM

(केविन मॅकग्लिन्शे (Kevin Mcglinchey) नावाच्या व्यक्तीने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या कुटुंबाला विनंती केली होती, की त्याच्या अस्थी पबच्या बाहेर विसर्जित व्हाव्यात UK Man Pours Father's Ashes)

मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेर विसर्जित करा, वडिलांची विचित्र इच्छा, मुलं म्हणाली..
Follow us on

लंडन : आपलं जग अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींनी भरलं आहे. जगात दररोज अशा घटना घडतात, ज्याकडे आपलं आपसूकच लक्ष जातं. खरं तर, प्रत्येक माणसाच्या मनात कुठली ना कुठली इच्छा असते. काही जण स्वतःच्या इच्छा स्वतःच पूर्ण करतात, तर काही जणांची अंतिम इच्छा त्यांच्या जवळचे नातेवाईक मृत्यूनंतर पूर्ण करतात. आपल्या आवडत्या पबबाहेरील नाल्यात आपली अस्थी विसर्जित करण्याची इच्छा यूकेमधील एक महाशयाने मनात धरली होती, ती त्याच्या कुटुंबीयांनी पूर्णही केली. (UK Man Pours Father’s Ashes Down The Drain Outside His Favourite Pub To Honour His Last Wish)

वडिलांची विचित्र इच्छा

कोणालाही ऐकण्यास विचित्र वाटत असले, तरी ही सत्य घटना युनायटेड किंगडममध्ये घडली आहे. केविन मॅकग्लिन्शे (Kevin Mcglinchey) नावाच्या व्यक्तीने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या कुटुंबाला विनंती केली होती, की त्याच्या अस्थी पबच्या बाहेर विसर्जित व्हाव्यात. त्यांच्या मुलाने आणि मुलीने त्यांच्या मृत्यूनंतर ही इच्छा पूर्ण केली. त्यांनी वडिलांच्या अस्थीची राख बियरमध्ये ओतली आणि नंतर ते पबच्या बाहेर असलेल्या नाल्यात ओतले. ज्या व्यक्तीने ही अनोखी इच्छा व्यक्त केली त्याच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले की कोणालाही हा वेडसरपणा वाटेल, परंतु ही आमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती.

मृत्यूनंतरही आप्तांना भेटण्याची मनिषा

ज्या व्यक्तीने आपल्या परिवाराकडे ही विचित्र इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली होती, त्याची मुलगी म्हणाली की माझ्या वडिलांना हे पब खूप आवडायचे, ते दररोज इथे येत असे. ते नेहमी म्हणायचे, ‘माझ्या अस्थी पबच्या बाहेरील बाजूस विसर्जित करा म्हणजे मी जिवंत नसतानासुद्धा माझ्या आप्तेष्टांना भेटू शकेन. जेव्हा जेव्हा लोक इथून जातील तेव्हा ते माझी आठवण काढतील. याव्यतिरिक्त, त्याची मुलगी असेही म्हणाली की तिने आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केल्यामुळे तिला खूप आनंद झाला.

मनमाडच्या तरुणांकडूनही अखेरचा निरोप

आई-वडिलांचा सांभाळ करणं ओझं वाटल्याने त्यांची वृद्धाश्रमात रवानगी करण्याची उदाहरणं हल्ली पाहायला मिळतात. मात्र मनमाडमध्ये घडलेली घटना कोणाच्याही डोळ्यात टचकन पाणी आणेल. आपल्या आईची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी या श्रावणबाळाने प्रसंगी सरकारी उंबरे झिजवले. पतीच्या कबरेशेजारी चिरशांती घेण्याची आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी लेकाने तिचे पार्थिव तीन महिन्यांनी बाहेर काढून इच्छितस्थळी दफन केले. (UK Man Pours Father’s Ashes)

कोरोना संशयातून मनमाडमध्येच दफन

मंजुळा क्षीरसागर यांचे निधन झाले, त्या मालेगावातील रुग्णालयापासून त्यांचे मूळ गाव 37 किलोमीटर दूर होते. कोरोना अहवाल येणे बाकी होते, मात्र स्थानिक अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना त्या कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी मनमाडमध्येच मंजुळा यांचे अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे मुलगा सुहासला नाइलाजास्तव मालेगावात अंत्यसंस्कारासाठी परवानगी द्यावी लागली.

तीन महिन्यांचा लढा

मंजुळा क्षीरसागर यांचे दफनविधी झाल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल आला, त्यामध्ये त्या निगेटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे दोन्ही मुलांनी आपल्या आईची अखेरची इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. आईचे पार्थिव मनमाडच्या कब्रस्तानात दफन करण्याचा निर्धार त्यांनी केला. जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. तीन महिन्यांच्या लढ्यानंतर त्यांना यश आलं. प्रशासनाने मंजुळा क्षीरसागर यांचे पार्थिव सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबाकडे सोपवलं. त्यानंतर मनमाडमध्ये ख्रिस्ती रिवाजानुसार त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं.

संबंधित बातम्या :

आईची अखेरची इच्छा, मनमाडच्या तरुणाने तीन महिन्यांनी कबर बाहेर काढली आणि…

(UK Man Pours Father’s Ashes)