रशिया युक्रेनमधील यु्द्ध (Russian Ukraine War) अधिक भयानक पातळीवर असल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. युक्रेनची राजधानी कीव शहरात रशियाकडून रात्रीच्या सुमारास जोरदार बॉम्ब हल्ला करण्यात आला. त्यावेळी हल्ल्यात आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शॉपिंग मॉल (Shopping mall) देखील त्या हल्ल्यात जमीनदोस्त झाला आहे. त्या शॉपिंगमॉलमध्ये युक्रेनच्या सैन्याने अनधिकृतपणे दारूगोळा ठेवला असल्याचा रशियाचा दावा आहे. रशियाकडून एक व्हिडीओ (video) प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामध्ये युक्रेनमधील शॉपिंग मॉलवरती बॉम्ब हल्ला केल्याचं दिसत आहे.
A shopping mall, illicitly used as an ammunition depot by Ukrainian forces, has been destroyed in a precision missile strike, seen in new footage released by the Russian Ministry of Defense. pic.twitter.com/R8kku7NWoY
— RT (@RT_com) March 22, 2022
शक्तिशाली स्फोटात होत्याचं नव्हतं झालं
हा झालेला हल्ला युक्रेनच्या मॉलशेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी पाहिला आहे. ते म्हणतात की, रात्रीच्या सुमारास मॉलच्या स्टेरिसवरती अचानक स्फोट झाला. त्यावेळी जोराचा आवाज आणि आग पाहायला मिळाली. इतक्या जोरात स्फोट झाला की, आमच्या घराच्या खिडकीच्या काचा देखील फुटल्या आहेत. तसेच हल्ल्यानंतर मॉलला प्रचंड मोठी आग लागली होती. ही आग अनेक किलोमीटरवरून दिसत होती. रशिया युक्रेनच्या युद्धामुळे खूप नुकसान झाले असले तरी सुमारे 30 लाख लोकांनी आपला देश सोडला आहे.
अतिशय भयानक हल्ला
चार आठवड्यांपासून रशियाचं सैनिक युक्रेनमधील महत्त्वाची ठिकाणी हल्ले करीत आहे. नुकताच रशियाच्या सैन्याने राजधानी कीव मधील एका शॉपिंग मॉलवरती जोरदार हल्ला केल्याचं व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. बॉम्ब हल्ल्यामुळे शेजारी असणाऱ्या शाळेचं सुध्दा नुकसान झालंय. युद्ध सुरू होणाऱ्या युक्रेनच्या राजधानीत साधारण तीस लाख लोक राहायला होती. पण युद्ध सुरू झाल्यानंतर लोकांनी शेजारच्या देशात आश्रय घेतला आहे. त्याचबरोबर सध्या युक्रेनमध्ये असलेली लोक भीतीच्या सावटाखाली आयुष्य जगत आहेत. युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरातील अत्यंत महत्त्वाची ठिकाणे, कार्यालये, अणुऊर्जा केंद्र रशियाने ताब्यात घेतली आहेत. तर काही ठिकणं उद्धवस्त देखील केली आहेत. युक्रेनमध्ये सगळीकडे धुरांचे लोट दिसत असल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.