रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सध्याची परिस्थिता युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे युक्रेनमध्ये वास्तव करीत असलेल्या भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याचा सल्ला युक्रेनचे भारतीय दुतावासाने दिले आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती अधिक बिकट होईल असं वाटतंय. कारण आत्तापर्यंत रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या अनेक भागात बॉम्ब हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे कीव (kiev) राजधानीतील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे अनेकांचे तिथले नागरिक व्हिडीओच्या माध्यमातून सांगत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत युक्रेन सोडलं असून ते भारतात परतले आहेत. तर अजून काहीजण तिथं अडकले असल्याची माहिती मिळत आहे. भारतासह अनेक देशांचे नागरिक तिथं राहत असून अनेकांनी आत्तापर्यंत देश सोडलाय तर अनेकजण देश सोडण्यासाठी मार्ग शोधत आहेत.
A group of Indian students stranded in Ukraine has entered Poland, to undertake the onward journey to India pic.twitter.com/Rm3YvumzoC
— ANI (@ANI) March 1, 2022
18,000 हून अधिक भारतीय युक्रेनमध्ये वास्तव्यास होते
युक्रेनमधून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी परत विमानाने आल्याचे आपण पाहतोय. कारण रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला आता 5 दिवस झाल्यामुळे तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असल्याने तिथं वास्तव करीत असलेल्या अनेक लोकांनी देश सोडला आहे. युक्रेनच्या अनेक भागात रशियाने आक्रमण केल्याने तिथली परिस्थिती भयान असल्याची व्हिडीओच्या माध्यमातून समजते आहे. युक्रेनमध्ये 18,000 लोक वास्तव करीत असल्याची माहिती टाईम्सने दिली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत भारतात परलेल्या लोकांची यादी अत्यंत कमी आहे. युक्रेनच्या शेजारी असलेल्या देशात विद्यार्थ्यांना किंवा नोकदारांना बोलावलं जात आहे आणि त्यानंतर तिथून त्यांना भारतात आणण्याच काम भारत सरकार करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. युक्रेनमध्ये सध्या असलेल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही परत आणण्याचा प्रयत्न करू असं भारत सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे तिथ किती विद्यार्थी आणि नोकर अडकले आहेत हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
Embassy of India in Ukraine advises Indians to leave Kyiv urgently today pic.twitter.com/tmoXpWTd1l
— ANI (@ANI) March 1, 2022
1568 जण युक्रेनमधून आत्तापर्यंत परतले
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तिथं शिक्षणासाठी असलेल्या अनेक भारतीयांनी युक्रेन सोडलं असून ते तिथल्या शेजारच्या देशात जाऊन भारतात परतले आहेत. कोणत्या जिल्ह्यातील किती लोक युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती प्रशासनाने जमा केली आहे त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचे समजते. 18 हजार लोकांपैकी आत्तापर्यंत 1568 लोकांना भारतात आणण्यातं सरकारला यश मिळालं आहे. आजचा युद्धाचा 5 वा दिवस असून त्यांनी आत्तापर्यंत रशियाने युक्रेनच्या महत्त्वाच्या स्थळांवरती बॉम्ब हल्ला केला असल्याने तिथली परिस्थिती चिघळली असल्याचं समजतंय. आज सकाळी 182 विद्यार्थी विमानाने परतले आहेत. तसेच कीव शहर सोडण्याचं फर्मान निघाल्याने तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.