Video : जाळ अन् धूर सोबतच! युक्रेनच्या प्रत्युत्तरात रशियाचे नऊ रणगाडे नष्ट; संरक्षण मंत्रालयाचा दावा

| Updated on: Jul 09, 2022 | 12:24 PM

रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध (Russia-Ukraine war) सुरूच आहे. युक्रेनच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात रशियाचे नऊ रणगाडे नष्ट झाल्याचा दावा संरक्षण मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला आहे.

Video : जाळ अन् धूर सोबतच! युक्रेनच्या प्रत्युत्तरात रशियाचे नऊ रणगाडे नष्ट; संरक्षण मंत्रालयाचा दावा
Follow us on

रशिया आणि युक्रेनमध्ये आजूनही युद्ध (Russia-Ukraine war) सुरूच आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचं (Ukraine) मोठं नुकसान झालं आहे. मात्र युक्रेनने देखील अद्याप हार मानलेली नाही. युक्रेन देखील बलाढ्य रशियाला तोडीस तोड प्रत्युत्तर देत असल्याचे दिसून येत आहे. आता हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. युक्रेनच्या हवाई दलाकडून हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये स्फोट होताना दिसत आहे. या स्फोटामध्ये काही रणगाडे नष्ट झाले आहेत. हा व्हिडीओ जारी करून आम्ही रशियाचे नऊ रणगाडे (Tanks) नष्ट केल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत युक्रेनने रशियाचे जवळपास 2 हजार टँक नष्ट केल्याचा दावा देखील संरक्षण मंत्रालयाने केला आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून, युक्रेनमधील लाखो लोकांनी स्थलांतर केले आहे. हे नागरिक शेजारी असलेल्या देशांच्या अश्रयाला पोहोचले आहेत.

लाखो लोकांचे स्थलांतर

दरम्यान युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून यापूर्वी देखील काही ट्विट करण्यात आले आहेत. त्यामध्ये देखील त्यांनी अशाच नष्ट झालेल्या काही रणगाड्यांचे फोटो टाकले आहेत. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र हे युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. दोनही देशांकडून अत्यंत घातक अशा शस्त्रांचा मारा सुरू आहे. या युद्धात युक्रेन पूर्णपणे बेचिराख झाले आहे. लाखो लोकांनी आतापर्यंत युक्रेन सोडले आहेत. हे नागरिक शेजारी असलेल्या देशांच्या आश्रयाला गेले आहेत. रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील सर्व प्रशासकीय इमराती नष्ट झाल्या आहेत. तर दुसरीकडे युक्रेनने दिलेल्या प्रत्युत्तरात रशियाचे देखील मोठे नुकसान झाले आहेत. त्यांचे अनेक रणगाडे नष्ट झाले आहेत. सोबतच मोठ्या प्रमाणात सैन्य देखील मारले गेले आहे.

हे सुद्धा वाचा

 

युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम

या युद्धाचा संपूर्ण देशावरच दुर्गामी परिणाम झाला आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन जगातील प्रमुख निर्यातदार देश आहेत. रशिया आणि युक्रेनकडून विविध वस्तुंची निर्यात इतर देशांना केली जाते. मात्र आता युद्ध सुरू असल्याने निर्यात ठप्प आहे. अमेरिकेने रशियावर घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे कच्च्या तेलाचे दर वाढले असून, महागाईने उच्चांक गाठला आहे. गहू आणि तेलाचे दर देखील वाढले आहेत. वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक देशातील मध्यवर्ती बँकांना रेपो रेट वाढवण्याची वेळ आली आहे.