युक्रेनने (ukraine) रशियाच्या (russia) दोन अधिकाऱ्यांना मारल्याचा दावा केला आहे. आत्तापर्यंत अधिका-यांनी अनेक युद्धात (war) युक्रेनला चांगली मदत केली होती. पण रशियाने आत्तापर्यंत मृत्यूबाबत कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही त्यामुळे अजूनही साशंकता आहे. सदर माहिती युक्रेनच्या रक्षा मंत्रालयाकडून देण्यात आली असून युद्धात मेजर जनरल विताली गेरासिसोव या रशियन अधिका-यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे. या आठवड्यात दोन महत्त्वाचे अधिकारी मारले असल्याचे युक्रेनने सांगितले आहे. याच्या आगोदर युक्रेनकडून एंड्री सुखोवेत्स्की या देखील अधिका-यांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही देशामधील युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोण आहेत विताली गेरासिमोव ?
युद्धात महत्त्वाची भूमिका
रशियाचे 11 हजार सैनिक मारल्याचा दावा
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात रशियाने आत्तापर्यंत युक्रेनच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच युक्रेनच्या काही महत्त्वाची स्थळ रशियाने ताब्यात देखील घेतली आहेत. युक्रेनने सुध्दा रशियाचे दोन महत्त्वाचे अधि-यांसहीत 11 हजार सैनिक मारल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांचं युध्दात अधिक नुकसान झालं असून त्याचाी जाणीव दोन्ही देशांना असेल अधिक नुकसान युक्रेनचं झालं असून युक्रेनमध्ये लोक भीतीखाली आयुष्य जगत असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यावर अनेक ठिकणी इमारती कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी बॉम्बच्या हल्ल्याने रस्ते उद्वस्त झाले आहेत. आत्तापर्यंत अनेक लोकांनी देश देखील सोडला आहे.