नवी दिल्ली : रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी यूक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. रशियाने याआधीच पूर्व युक्रेनमधील ‘डोनेस्तक’ आणि ‘लुहान्स्क’ येथे सैन्य पाठवले होते. यासोबतच रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या (Ukraine) सीमेजवळ तैनात केलं आहे.रशियानं यूक्रेनवर हल्ला केला आहे. रशियानं युद्धाची घोषणा करत यूक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केलीय. रशियानं हल्ला केल्यानंतर यूक्रेनमधील लोक देश सोडून पळू लागले आहेत. रशियाच्या बरोबर बेलारुसनं देखील यूक्रेनवर हल्ला केला आहे. यूक्रेनचं सैन्य दल देखील रशियाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी आता जागितक नेत्यांकडे मदतीची विनंती केली आहे. झेलेन्स्की यांनी जागतिक नेत्यांनी संरक्षण सामग्रीची मदत करावी. आम्हाला यूक्रेनची एअरस्पेसचं रशियाच्या सैन्यापासून संरक्षण करायचं आहे. एपी प्रेसनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
रशियाकडून यूक्रेनवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात येत आहेत. कीव शहरातील विमानतळावर देखील हल्ला करण्यात आला आहे. आता यूक्रेनेच वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी जागतिक पातळीवरील मोठ्या देशांकडे संरक्षण सामग्रीची मागणी केली आहे. यूक्रेनच्या एअरस्पेसचं संरक्षण करण्यासाठी मदतीची गरज असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
Ukrainian president urges world leaders to provide defence assistance, help protect Ukraine’s airspace from Russia, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) February 24, 2022
रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर नाटो कडून देखील जोरदार तयारी केली जात आहे. नाटोच्या 30 सदस्य देशांकडून रशियावर हल्ला केला जाणार आहे.
रशियाच्या सैन्यानं यूक्रेनच्या हवाई उड्डाण केंद्रांवर हल्ले सुरु केले आहेत. सैन्य दलाच्या ठिकाणांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. रशियानं बेलारुस मध्येही 30 हजार सैन्य तैनात केलं आहे. तेथून यूक्रेनची राजधानी कीव केवळ 75 किमी अंतरावर आहे. रशियानं राजधानीवर हल्ला करुन यूक्रेनपासून वेगळं पाडण्याचा उद्देश होता.
इतर बातम्या:
Russia Ukraine Crisis: युक्रेनच्या 10 शहरांवरती रशियाचा बॉम्ब हल्ला, 300 लोकांचा मृत्यू