जर्मनी : इथं तिथं यहाँ वहाँ देखु जहा हाय आपलीच हवा या गाण्याला साजेसा असा किस्सा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह घडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी( Prime Minister Narendra Modi) 26-27 जून रोजी होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जर्मनीत(Germany) दाखल झाले आहेत. येथे भारतीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. जर्मनीतील नागरिकांसह भारतीय वंशाच्या लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यादरम्यान एका भारतीय-जर्मन वधू-वर जोडीनेही पंतप्रधानांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वादही घेतले. याचा व्हिडिओ या जोडप्याने सोशल मिडीयावर शेअर केला असून हा व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये होता. यातच आता पंतप्रधान मोदींचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राष्ट्रपति जो बायडेन(US President Joe Biden) स्वत: पंतप्रधान मोदींकडे चालत आल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर कमेट्सचा वर्षाव होत आहे.
दोन महिन्यांतील मोदींचा हा दुसरा जर्मनी दौरा आहे. यापूर्वी ते २ मे रोजी जर्मनीला गेले होते. सध्याच्या जर्मनी दौऱ्यादरम्यान मोदी यांनी एका बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला सर्व देशांचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी जो बायडेन स्वत: मोदींजवळ गेले आणि त्याची भेट घेतली.
#WATCH | US President Joe Biden walked up to Prime Minister Narendra Modi to greet him ahead of the G7 Summit at Schloss Elmau in Germany.
(Source: Reuters) pic.twitter.com/gkZisfe6sl
— ANI (@ANI) June 27, 2022
अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी जगभरातील देशांच्या प्रमुखांना महिनोनमहिने वाट पहावी लागते. मात्र जो बायडेन ते स्वत: पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांजवळ गेले. बायडेन यांनी स्वत: मोदींचे लक्ष वेधून घेत त्यांच्याशी हास्तांदोलन केले.
मोदी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी बोलत होते, त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन स्वतः त्यांना भेटायला आले होते. यादरम्यान अनेक राजकारणी बिडेन यांच्या मार्गात दिसले, मात्र ते थेट पंतप्रधान मोदींच्या दिशेनेच वळत राहिले. त्यांनी मागून पीएम मोदींच्या खांद्यावर हात ठेवून आपली उपस्थिती दर्शवली, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून एकमेकांचे स्वागत केले.
या व्हिडिओवर सोशल मीडियावर भरपूर कमेंट येत आहेत. एका यूजरने लिहिले की, काही वर्षांपूर्वी या अमेरिकेने मोदीजींना व्हिसा दिला नाही आणि आज ते स्वत: हस्तांदोलन करायला येत आहेत अळी कमेंट एका युजरने केली आहे.
जो बायडेन यांच्या या कृतीची जगातील प्रमुख 7 आर्थिक महासत्तांच्या परिषदेत जोरदार चर्चा होत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वत: येऊन भेटणे हे भारताच्या वाढत्या जागतिक उंचीचे प्रतीक आहे. रशिया-युक्रेन युद्ध, कोविड महामारी आणि इतर मुद्द्यांवर भारताने केलेली मुत्सद्देगिरी अमेरिकेलाही पटली आहे. यामुळेच जो बायडेन पीएम मोदींना इतकं महत्त्व देताना दिसत आहेत.