Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प 34 प्रकरणात दोषी; तरीही लढवू शकतील का राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक?

| Updated on: May 31, 2024 | 9:09 AM

US Presidential Poll 2024 : अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर अडचणीचा डोंगर उभा ठाकला आहे. ट्रम्प यांना 34 प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. दोषी ठरविल्याने ते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प 34 प्रकरणात दोषी; तरीही लढवू शकतील का राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक?
ट्रम्प हनी-मनीमध्ये दोषी
Follow us on

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले आहेत. त्यापूर्वीच त्यांना न्यायपालिकेने मोठा झटका दिला आहे. अमेरिकन न्यायालयाने ट्रम्प यांना 34 प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयात खटला दाखल झाल्यापासून ट्रम्प यांनी स्वतःला निर्दोष म्हणून जाहीर केले होते. आता त्यांना दोषी ठरवल्यानंतर हे आपल्याविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नेमके काय आहे प्रकरण आणि आता ते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

निवडणूक केव्हा?

येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत निवडणुकीचे पडघम आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. ट्रम्प यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. न्यायालयाने त्यांना अजून शिक्षा सुनावलेली नाही. हनी-मनीप्रकरणात अडकलेले ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहे.  जर ट्रम्प यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली तर त्यांना निवडणूक लढवता येईल का? त्यांच्या प्रचारावर काय परिणाम होईल, यावर जगभर चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा

केव्हा ठोठाविण्यात येईल शिक्षा?

Trump यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पण अजून शिक्षा सुनावलेली नाही. याप्रकरणात 11 जुलै रोजी सुनावणी होईल. त्यादिवशी शिक्षा ठोठाविण्यात येईल. अमेरिकन कायद्यानुसार, त्यांना 4 वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनापूर्वीच शिक्षेचा निकाल येणार आहे.

15 जुलै रोजी पक्षाचे अधिवेशन होत आहे. त्याच्या चार दिवसाआधी त्यांना काय शिक्षा ठोठविण्यात येते, हे स्पष्ट होईल. या अधिवेशनात ट्रम्प यांच्या उमेदवारीची पक्ष अधिकृत घोषणा करणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक होत आहे. त्यावर या शिक्षेचा थेट परिणाम दिसून येईल. ज्या कायद्यातंर्गत त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे, त्यात कमी शिक्षा आणि दंडाची रक्कम पण जास्त नसेल.

ट्रम्प लडवू शकतील निवडणूक?

अमेरिकेतील कायद्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवल्यानंतर पण ते निवडणुकीच्या शर्यतीत भाग घेऊ शकतील. शिक्षेच्या त्यांच्या उमेदवारीवर कोणताही परिणाम होणार नाही. हा निकाल समोर येताच ट्रम्प यांच्या निवडणूक टीमने निधी जमविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचे नाव ‘मी राजकीय कैदी आहे’ असे ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी ट्रम्प पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील.

अमेरिकन घटनेनुसार, ट्रम्प राष्ट्रपती निवडणूक लढवू शकतील. संविधानात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी वयाची 35 वर्षे पूर्ण आणि मुळ अमेरिकन नागरिक असण्याची अट आहे. त्यामुळे ट्रम्प हे तुरुंगातून सुद्धा निवडणूक लढवू शकतील. पण त्यांच्या अनेक समर्थकांनुसार, तुरुंगात त्यांची हत्या घडवून आणली जाऊ शकते.

कोणत्या प्रकरणात ट्रम्प दोषी?

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 34 प्रकरणात दोषारोप ठेवण्यात आले होते. त्यात त्यांना अमेरिकन न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यामध्ये निवडणुकीतील निकालात हे फेरफार करण्याचा कट रचल्याचा आरोप, लैंगिक शोषण आणि लाचखोरी सारख्या प्रकरणांचा समावेश आहे.