Donald Trump : शूटरने जसा केला हल्ला, सुरक्षा रक्षकांनी क्षण ही नाही जाऊ दिला वाया, 200 मीटरवरुन स्नायपरने हल्लेखोर टिपला

| Updated on: Jul 14, 2024 | 4:09 PM

Donald Trump Attack : शनिवारी अमेरिकेत प्रचार सभेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोराने जसा हल्ला केला, त्यावेळी एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. पण पुढील अवघ्या काही क्षणात एकच थरार उडाला...

Donald Trump : शूटरने जसा केला हल्ला, सुरक्षा रक्षकांनी क्षण ही नाही जाऊ दिला वाया, 200 मीटरवरुन स्नायपरने हल्लेखोर टिपला
असा टिपला हल्लेखोर
Follow us on

पेन्सिलवेनिया येथील बटलरमधील एका प्रचार सभेदरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या गोळीबाराचे एक एक व्हिडिओ आता समोर येत आहे. या व्हिडिओत हा घटनाक्रम चित्रबद्ध झाला आहे. या हल्ल्यात हल्लेखोर सभा स्थानी उभ्या असलेल्या ट्रम्प यांच्यावर निशाणा साधतो. पण त्याचा निशाणा अवघ्या चार बोटांनी हुकता. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून जाते. त्याअगोदरच स्नायपर या फायरिंगने सावध होतात. अन् क्षणाचा ही विलंब न करता शूटर जागीच कोसळतो. हा तरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गोळीबाराने काळजाचा थरकाप

हे सुद्धा वाचा

अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प बटलरमधील सभेपुढे भाषण करत होते. त्याचवेळी अचानक फायरिंग सुरु होते. पहिल्या गोळीचा आवाज येताच, सभेच्या मंचाजवळ एका उंच बॉक्सवर बसलेला स्नायपर हल्लेखोराचा अंदाज घेताना दिसतो आणि लागलीच हल्लेखोरावर निशाणा साधतो. अमेरिकन सुरक्षा एजन्सनीचे प्रवक्ते अँथनी गुग्लिल्मी यांच्यानुसार, संशयित हल्लेखोराला स्नायपरने जागीच टिपले. स्नानयपरने त्याच्यावर 200 मीटर अंतरावरुन निशाणा साधला. त्याची गोळी थेट हल्लेखोराच्या डोक्यात घुसली आणि तो जागीच ठार झाला.

असा केला हल्ला

ट्रम्प बटलर येथे सभा स्थानी आले. एका खुल्या पटांगणावर ही सभा आयोजीत करण्यात आली होती. त्यांच्या मंचाजवळ 120 मीटर दुरवर एका कंपनीच्या छतावर हल्लेखोर लपून बसला होता. ट्रम्प उभे राहिले त्यानंतर लागलीच त्याने गोळी झाडली. सुरक्षा रक्षक गोळीबारामुळे सावध झाले. मंचा शेजारी उभारलेल्या एका उंच मचाणावर स्नायपरची टीम होतील. त्यातील एकाला हल्लेखोर दिसला. त्याने 200 मीटर अंतरावरुन निशाणा साधला आणि त्याचा खात्मा केला. जर त्याने अजून थोडा उशीर केला असता तर ट्रम्प यांचा जीव धोक्यात आला असता.

नशीब बलवत्तर म्हणून वाचले ट्रम्प

एका दुसऱ्या व्हिडिओत गोळी झाडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मान हलविल्याने ही गोळी त्यांना न लागता त्यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. जर त्यावेळी त्यांनी मान हलवली नसती तर गोळी थेट त्यांच्या डोक्यात गेली असती. माजी राष्ट्राध्यक्षावरील या अयशस्वी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उठले आहेत. हल्लेखोर इतक्या जवळ असताना सुरक्षा यंत्रणांना तो अगोदर कसा दिसला नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.