Russia Ukraine war : रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यात अनेकजण मारले गेल्याच्या बातम्याही आपण वाचत आहोत. तर अशा गंभीर परिस्थितीत काहीजण मात्र अत्यंत बेजबाबदारपणा करत असल्याचे दिसत आहे. कोणतीही एखादी मोठी घटना घडली तर त्याचे फोटो, व्हिडिओ यांच्याशी छेडछाड करण्याच्या घटना घडत असतात. आता रशिया युक्रेन युद्धादरम्यानही काही फेक (Fake) म्हणजेच खोटे फोटो, व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहेत. यातले अनेक फोटो, व्हिडिओ जुने (Old) आहेत. मात्र ते अशापद्धतीने शेअर केले जात आहेत, जसे काल-परवाचे ताजे आहेत. अशाप्रकारचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक काहीही विचार न करता ते फॉरवर्ड करतात. त्यामुळे अनेकांचा गोंधळ होत आहे. दरम्यान, फॅक्ट चेक करणाऱ्या विविध वृत्तसंस्था, पोर्टल्सच्या बीबीसी आदींच्या मते हे सर्व फेक असून यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.
युक्रेन आणि रशियामध्ये तणावाचे वृत्त समोर येताच, यादरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, की जेट फायटर प्लेनने युक्रेनवर हल्ला केला आहे. मात्र, नंतर ही क्लिप हटवण्यात आली. ही क्लिप बारकाईने पाहिली असता अमेरिकेत बनवलेले विमान F-16 असल्याचे निष्पन्न झाले.
नेमकी अशीच एक क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता, की शहरी भागावर लढाऊ आणि बॉम्बर विमाने उडताना दिसत आहेत. पण तपास केला असता हा 2020च्या एअर शोचा फोटो असल्याचे आढळून आले.
? فيديو | مقاتلات حربية روسية تحلق في أجواء العاصمة الأوكرانية كييف.#روسيا_واوكرانيا pic.twitter.com/tU26XuU5rB
— الرسالة للإعلام (@Alresalahpress) February 24, 2022
रशियन पॅराट्रूपर्स युक्रेनमधील खार्किवमध्ये उतरले आहेत, अशी आणखी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण 2016मध्ये इंटरनेटवर पहिल्यांदा ती पाहिल्याचे तपासात समोर आले.
रशियन जेट विमान युक्रेनने पाडले असल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण बीबीसीच्या तपासात हे लिबिया सरकारचे विमान असल्याचे समोर आले आहे. ज्याची 2011मध्ये बंडखोरांनी हत्या केली होती. या व्हिडिओमध्ये अरबी भाषेत सेलिब्रेशनचे आवाजही ऐकू येत आहेत.
Russian Jet Shotdown video in Ukraine is fake. It’s from Libya. Damn Twitter. pic.twitter.com/yJQwX7hEWl
— Sharmaake Jama ⭐⭐⭐️⭐️? (@SharmaakeJama) February 24, 2022
युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत वोलोदिमीर येलेचेन्को यांनीही एक क्लिप शेअर केली, जी प्रत्यक्षात 29 जानेवारी रोजी टिकटॉकवर अपलोड करण्यात आली होती. हा व्हिडिओ मारियुपोलचा असल्याचा दावा युक्रेनच्या राजदूताने केला होता. या व्हिडिओवर यूझर्सनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. सर्व यूझर्सनी सांगितले, की त्यात हिरवळ दिसते, तर फेब्रुवारीमध्ये मारियुपोलचे तापमान 0 डिग्रीच्या जवळ आहे. यासह अनेक फोटो, व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने शेअर केली जात आहेत.