Russia Ukraine Crisis: रशिया यूक्रेनवर आता हल्ला करणार नाही असं वाटत असतानाच पूर्व यूक्रेनचं शहर असलेल्या डोनेस्कमध्ये एका गाडीत मोठा स्फोट झालाय. एवढच नाही तर तेलाच्या पाईपलाईनला आग लावण्यात आलीय. डोनेस्क शहर रिकामं केलं जातंय. एटीएमच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्यात आणि लोक शहरं रिकामं करताना दिसतायत. विशेष म्हणजे हे शहर फुटीरतावाद्यांच्या ताब्यात आहे ज्यांना रशियाचा पाठिंबा आहे. त्यामुळेच हा हल्ला नेमका कुणी केला याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय. पण फॉल्स फ्लॅग अभियानातून यूक्रेनवर ही हल्ल्याची सुरुवात तर नाही अशी शंका बोलली जातेय.
Orphans from #Donetsk’s boarding school #1 are the first to be evacuated to Russia
More: https://t.co/2TY3k2K84E pic.twitter.com/x5Jl5mz2C5
— RT (@RT_com) February 18, 2022
पूर्व यूक्रेनमध्ये नेमकं काय चालू आहे?
डोनेस्कमध्ये ज्या गाडीत स्फोट झाला ती गाडी क्षेत्रीय सुरक्षा प्रमुख डेनिस सिनेंकोव यांची असल्याची माहिती समोर येतेय. पण हा हल्ला नेमका कुणी केला हे मात्र अजूनही समोर आलेलं नाही. रशियाच्या सरकारी न्यूज चॅनल्सनं
डोनेस्कच्या ह्या घटनेचे काही व्हिडीओ मात्र प्रसारीत केलेले आहेत. ह्या व्हिडीओत स्फोट होताना स्पष्ट दिसतोय एवढच नाही तर अनाथ मुलांना पहिल्यांदा स्थलांतरीत केलं जातंय. एवढच नाही तर युद्धाच्या भीतीनं डोनेस्क शहरच
ओस पडत असल्याचं दिसतंय. काही ठिकाणी लोकांनी एटीएमसमोरही रांगा लावल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसतंय. सध्या तरी पूर्व यूक्रेनमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी असे दोन्ही बाजूचे व्हिडीओज हेच पुरावे
आहेत.
First Buses Out: Women & children flee #Donetsk for safety amid fears of military escalation
More: https://t.co/W1HKpFhzsD pic.twitter.com/bZMsAZBrZt
— RT (@RT_com) February 18, 2022
फॉल्स फ्लॅग अभियान काय आहे?
अनेक युद्धात काही वेळेस हे अभियान चालवल्याचा इतिहास आहे. म्हणजेच ज्या देशाला युद्ध करायचंच आहे तो देश स्वत:च्याच भूमीवर हल्ला घडवून आणतो आणि त्याचं खापर मात्र शत्रू राष्ट्रावर फोडतो आणि त्याचा बदला म्हणून मग तो त्या शत्रू राष्ट्रावर हल्ला करतो. तिथूनच युद्धाची ठिणगी पडते. रशियाही सध्या अशाच फॉल्स फ्लॅग मार्चच्या माध्यमातून यूक्रेनवर हल्ला करत असल्याचं अमेरीकेचं म्हणणं आहे. कारमध्ये जो स्फोट झालाय त्याला रशिया हा यूक्रेनला जबाबदार धरतोय. जर पूर्व यूक्रेनवर रशिया समर्थक फुटीरतावाद्यांचा कब्जा आहे तर मग गाडीला यूक्रेन कसं उडवेल असा सवाल यूक्रेनकडून विचारला जातोय.
#Donetsk: Blast at DPR govt building ripped through a vehicle belonging to Denis Sinenkov – head of People’s Republic militia
More: https://t.co/Cv3MH348VB pic.twitter.com/6Zt9QIe4C1
— RT (@RT_com) February 18, 2022
अमेरीकेचं काय म्हणनं आहे?
अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरीका यूक्रेन बॉर्डरवर स्वत:चं सैन्य पाठवणार नाही पण यूक्रेनला पूर्ण पाठिंबा असेल असं स्पष्ट केलंय. नाटो देशांच्या फौजा मात्र यूक्रेनला पूर्ण मदत करतील. एवढच नाही तर रशियानं हल्ला केलाच तर त्याच्यावर कडक निर्बंध लावले जातील याची आठवणही बायडेन पुन्हा पुन्हा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना करुन देतायत.
हे सुद्धा वाचा:
आज तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार? काय आहे रशिया-यूक्रेनचा संघर्ष? जाणून घ्या फोटोस्टोरीतून