Cooking on Lava of Live Volcano : युरोपमधील आईसलँडची (Iceland) राजधानी रेक्यावीकपासून (Reykjavik) जवळपास 40 किलोमीटर अंतरावर एका ज्वालामुखीचा (Fagradalsfjall volcano) उद्रेक पाहायला मिळाला. तब्बल 800 वर्षांपासून शांत असलेल्या या लाव्हारसाने मागील आठवड्यात अचानक उसळी घेतली आणि तो भूपृष्ठाच्या बाहेर आला. त्यानंतर या ज्वालामुखीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत. यातीलच एका व्हिडीओत काही लोक लाव्हारसावर जेवण बनवण्याचं काम करताना दिसत आहेत. हा जेवण बनवतानाचा व्हिडीओ ईरिकूर हिलमार्रसन नावाच्या व्यक्तीने यूट्यूबवर शेअर केलाय. हा व्हिडीओ 11 सेकेंदाचा आहे (Video showing Man Cooking on live Lava of Volcano in Iceland).
व्हिडीओत दिसत आहे की हे लोक लाव्हारसावर एक पॅन ठेऊन त्यात अंडे फोडून टाकत आहेत. व्हिडीओचा शेवट हे लोक अंडं शिकण्याची वाट पाहताना संपतो (Cooking on Lava of Live Volcano). हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देण्यात आले आहे. त्यात म्हटलं आहे, “‘आईसलँडमध्ये 2021 मध्ये उकळत्या ज्वालामुखीवर बेकन आणि अंडे बनवताना.’
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आकाशातही लालेलाल वातावरण
ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाल्यानंतर या परिसरातील वातावरण काहीसं भितीदायक झालं होतं. निळ्याभोर आकाशाचं रुपांतर लगेचच लालेलाल आकाशात झालं. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचं समजल्यानंतर हजारो लोक हे पाहण्यासाठी या भागात गोळा होण्यास सुरुवात झालीय. व्हिडीओ पोस्ट करणारे हिलमार्रसन देखील याच लोकांपैकी एक आहेत.
ज्वालामुखीच्या स्फोटाचं ठिकाण रहिवासी वस्तींपासून दूर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल याबाबत आम्हालाही अंदाज होता. हा ज्वालामुखी रेक्येनीस पेनिनसुलामध्ये आहे. मागील 800 वर्षांपासून हा ज्वालामुखी भूर्गर्भात शांत अवस्थेत होता (Iceland Volcano Eruption 2021). या ठिकाणाहून लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली तेव्हा आकाशातही लाल रंगाचं सावट तयार झालं. असं असलं तरी लाव्हारस बाहेर पडत असलेलं हे ठिकाणी रहिवासी भागापासून खूप दूर आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या ठिकाणी दोन्ही बाजूने लाव्हारस वाहत आहे.
32 किमीवरुनही ज्वालामुखी दिसला
एक रस्ता या ज्वालामुखीपासून अवघ्या 2.5 मीटरवर आहे. हा ज्वालामुखी इतका मोठा आहे की 32 किलोमीटरवरुनही तो सहजपणे दिसतोय. या भागात भूकंपाचे धक्के बसल्याने शांत असलेला हा लाव्हारस भूगर्भातून बाहेर आल्याचं सांगितलं जातंय.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Video showing Man Cooking on live Lava of Volcano in Iceland