तेल अवीव | 12 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि पॅलेस्टिनी वादात अतिरेकी संघटना हमासने 7 ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीतून अचानक 5000 हून रॉकेटचा मारा करीत जगाला धक्का दिला. गेल्या सहा दिवसापासून त्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्या तुंबळ युद्ध सुरु आहे. इस्रायलने देखील गाझा पट्टीवर ताबडतोब प्रतिहल्ले करायला सुरुवात केली आहे. इस्रायली वायू सेनेने रात्री उशीरा हमासच्या कमांड सेंटरवर हल्ले केले आहेत. इस्रायलच्या मिसाईलनी हमासच्या नुखबा फोर्सला लक्ष्य केले आहे. शनिवारी इस्रायलवर हल्ला करणारी ही नुखबा फोर्स नेमकी कशी आहे? का आहे ती इतकी खतरनाक …
नुखबा फोर्स एक अशी फोर्स आहे ज्यातील तरुणांची निवड हमासचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष कमिटी करते. या फोर्स मधील तरुण गनिमी युद्धात तरबेज असतात, हे तरुण भुयारातून शिरु शकतात, तसेच एंटी टॅंक मिसाईल, रॉकेट आणि स्नायपर फायर सारखे हल्ले करण्यात तरबेज असतात. यासाठी त्यांना खतरनाक मानले जाते. नुखबा फोर्सचे कमांडो हमासच्या वरिष्ठ नेतृत्वाची सुरक्षा करण्यासाठी वापरले जातात.
इस्रायल डीफेन्स फोर्स ( IDF ) चे प्रवक्ते जोनाथन कॉनरिकस यांनी सांगितले की साल 2007 पासून पॅलेस्टिनी अतिरेकी हमास यांनी गाझा पट्टीचा ताबा मिळविल्यानंतर गाझापट्टीच्या अन्य क्षेत्रापर्यंत भूमिगत भुयारे खणत त्याचे एक नेटवर्क तयार केले होते. या भुयारांचा वापर नुखबा फोर्स घुसखोरीसाठी करीत असल्याचे ते म्हणाले. आयडीएफने या भुयारी मार्गांचे नेटवर्क तोडण्यासाठी हल्ले केले आहेत. तसेच हमास ऑपरेशन बेस नष्ट केले जात आहेत.
आता इस्रायल हमासला संपविण्यासाठी जमीनीवरील युद्ध प्रारंभ करणार आहे. आपण केवळ आदेशाची वाट पाहात असल्याचे इस्रायली सैन्याचे प्रवक्ते रिचर्ड हेचट यांनी गुरुवारी सांगितले. हमास आमच्या नागरिकांना जोपर्यंत सहिसलामत सोडत नाही तोपर्यंत त्यांचे पूर्ण घेराबंदी करुन वीज, पाणी, अन्न, इंधन आणि गॅस पुरवठा बंद ठेवला जाईल असे ऊर्जामंत्री काट्ज यांनी म्हटले आहे.