मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : चारही बाजूंनी मुस्लीम देशांनी घेरलेल्या इस्राइलवर पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना हमासने हल्ला केल्याने दोन देशात युद्ध छेडले गेले आहे. या दोन्ही देशातील या युद्धाला एक धार्मिक रंग देखील आहे. पॅलेस्टाईन हा मुस्लीम देश आणि इस्राइल हा ज्यूंचा देश यांच्यादरम्यानचा रक्तरंजित सघर्ष खूप जुना आहे. लोकसंख्येचा विचार करता जगात सर्वात जास्त कोणता धर्म मानणारे लोक आहेत. पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणता धर्म आहे. पाहुयात…
संयुक्त राष्ट्राच्या मते 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाच्या लोकसंख्येने 800 कोटीचा आकडा पार केला होता. 700 कोटीहून 800 कोटी लोकसंख्येपर्यंत पोहचायला जगाला 12 वर्षांचा काळ लागला. आता 900 कोटी लोकसंख्या गाठयला आता केवळ 15 वर्षांचा काळ पुरेसा आहे असे म्हटले जात आहे. वर्ल्डोमीटरचे आकड्यानूसार जगाची लोकसंख्या 806 कोटीहून अधिक आहे. लोकसंख्येच्या बाबतीत आधी पहिल्या क्रमांकावर चीन होता. आता पहिल्या क्रमांकावर भारताचे नाव कोरले गेले आहे. आणि चीन दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे, तर तिसरा क्रमांक अमेरिकेचा आहे.
असे म्हणतात जगातील 85 टक्के लोक आपली ओळख आपल्या धर्मामुळे निर्माण होते असे मानतात. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्यूच्या आकड्यानूसार यात सर्वात आधी ख्रिस्ती धर्माचे अनुयायी जगात सर्वात जास्त आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर इस्लामला मानणारे आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर हिंदू धर्माचे अनुयायी आहेत. या क्रमवारीत ज्यू लोकांची संख्या सातव्या क्रमांकावर आहे. रिपोर्टनूसार साल 2020 च्या अंदाजानूसार जगात ख्रिस्ती धर्माला मानणारे 2.38 अब्ज ( म्हणजेच 238 कोटी ) लोक आहेत. तर इस्लामला मानणारे 191 कोटी लोक आहेत. हिंदू धर्माला 116 कोटी लोक मानतात. बौद्ध धर्माचे लोक 50.7 कोटी आहेत. तर अन्य धर्माची लोकसंख्या 6.1 कोटी आहे. तर ज्यू धर्मियांची संख्या 1.46 कोटी इतकी आहे.
Pew Research Centre च्या साल 2015 च्या अहवालानूसार साल 2050 पर्यंत जगात मुस्लीम लोकसंख्या 280 कोटीपर्यंत पोहचू शकते. एकूण जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लीमांची लोकसंख्या दुप्पट वेगाने वाढण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत सांगितले की, 2011 च्या जनगणनेनूसार मुसलमानांची लोकसंख्या 17.22 कोटी होती, जी देशाच्या लोकसंख्येच्या 14.2 टक्के होती. टेक्निकल ग्रुप ऑन पॉप्युलेशन प्रोजेक्शनच्या जुलै 2020 च्या अहवालानूसार 2023 मध्ये भारताची लोकसंख्या 138.82 कोटी होण्याचा अंदाज लावला होता. 2011 च्या लोकसंख्या वाढीनूसार एकूण लोकसंख्येशी मुसलमानांचे ( 14.2 टक्के ) प्रमाण पाहता. साल 2023 मध्ये मुसलमानांची लोकसंख्या 19.75 कोटी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
साल 2011 च्या जनगणनेनूसार भारतात हिंदूंची लोकसंख्या 96.63 कोटी होती. मुसलमानांची लोकसंख्या 17.22 कोटी होती. तर देशात ख्रिस्ती धर्मियांची लोकसंख्या 2.78 कोटी, शीख धर्मिय 2.08 कोटी, बौद्ध धर्मीय 0.84 कोटी, जैन धर्मिय 0.45 कोटी, अन्य 0.79 कोटी होती.