आपला शेजारील देश ज्याची अर्थव्यवस्था आपल्याहून चांगली होती. हैप्पीनेस इंडेक्समध्ये आपल्या पुढे ते होते परंतू हा आता इतिहास झाला आहे. कारण आरक्षणाच्या आगीत हा देश होरपळत आहे. बांग्लादेशच्या तरुणांच्या हिंसक आंदोलनाने तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना परांगदा व्हावे लागले.आणि देश सोडून भारत गाठावा लागला आहे. सोमवारी गाजियाबाद येथील हिंडन एअरबेसवर शेख हसीना यांचे विमान उतरले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दीड तास बैठक झाली आहे. या बैठकीला परराष्ट्रमंत्री आणि एनएसएने बांग्लादेशातील परिस्थितीबाबत या बैठकीत पंतप्रधानांना माहिती दिली आहे. जनतेने पंतप्रधान निवासात घुसून लूटालूट केली आहे.
बांग्लादेशातील आरक्षणाने पेटलेल्या लुटालुट आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.हे व्हिडीओ हैराण करणारे आहेत. या व्हिडीओतील दृश्यानुसार कोणत्याही देशात आजपर्यंत असे पंतप्रधानांचे निवासस्थान लूटल्याचे नजीकच्या काळात तरी घडलेले नाही. एका व्हिडीओत तर मोठा जमाव हातात मिळेत ती चीजवस्तू लुटून नेत जात असल्याचे चित्र दिसत आहे. एका व्हिडीओत खूर्ची, टेबल, सोफा, कुराण, लॅम्प, महागडे पंखे, फर्निचर, रोपटी, आरओ प्युरीफायर, टीव्ही, ट्रॉली बॅग, एवढंच काय भांडीकुंडी, पातेली लूटून घेऊन जाताना बांग्लादेशी जनता दिसत आहे.
ट्वीटरवरील पोस्ट येथे पाहा –
Fall of Bangladesh government attributed to record high unemployment & inflation!
Nearly 8 lakh graduates are unemployed in #Bangladesh
Students were protesting the 30% job quota for families of freedom fighters. The supreme court then intervened & reduced the Quota to 5%…… pic.twitter.com/rwdAHTe6Z3
— Nabila Jamal (@nabilajamal_) August 5, 2024
एका व्हिडीओत बांग्लादेशातील जनता त्यांच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या वैयक्तिक वस्तू देखील लुटून नेताना दिसत आहेत यात काहींच्या हातात त्यांच्या बागेतील बदक दिसत आहेत. तर काहींच्या हातात त्यांच्या घरातील बकरी लुटताना दिसत आहेत. लोक हे सर्व करताना मोबाईलवर सेल्फी देखील घेत आहेत. एक महिलेला तर लुटलेली जिम मशिन तेथेच ट्राय करताना दिसत आहे. एक व्यक्तीने तर लुटलेली साडी तेथेच लपेटून फोटा काढण्यासाठी मस्तपैकी पोझ दिली आहे. एकाच्या हातात अंतर्वस्र देखील आहेत. एकाने तर कॉर्डलेस फोन लुटला आहे. एक व्यक्ती पलंगावर बसुन इतरांना प्रोत्साहन देताना दिसत आहे.
हसीना शेख यांच्या निवासस्थानी लुटमार झाल्यानंतर अवामी लिग पक्षाच्या खासदार आणि मंत्र्यांच्या निवासस्थानांवर देखील हल्ला झाला आहे.आगी लावल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. बांग्लादेशातील चार हिंदू मंदिरांना देखील लक्ष्य केले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष यावेळी बांग्लादेशातील घडामोडींवर लागले आहे. भारतात पोहचलेल्या शेख हसीना यांच्या बरोबर त्यांची बहीण शेख रेहाना देखील आहेत. बांग्लादेशातील लष्कराने अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून आरक्षणावरुन बांग्लादेश पेटला आहे. परंतू सोमवारी हद्दच झाली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानालाच लक्ष्य केल्याने त्यांनी देश सोडत भारतात आश्रय घेतला आहे.