अरब देशात पिण्यासाठी पाणी नाही. अन्नधान्य तयार करण्यासाठी सुपीक जमीन नाही. परंतु, त्यांच्याजवळ इंधन आहे. या तेलाच्या भरोशावर ते जगातील काही देश खरेदी करू शकतात. जगात सर्वात महाग चलन हे कुवेतचे दिनार आहे. जगातील सर्वात जास्त पैसे कमवणारी कंपनी सौदी अरबमध्ये आहे. या कंपनीचे नाव आहे सौदी अरामको. जगातील कोणताही देश अरब देशांशी वाद घालत नाही. कारण त्यांच्याकडे इंधनाचे साठे आहेत. इंधन आणि गॅसची विक्री करून अरब देश श्रीमंत झाले आहेत. इंधनाचे साठे संपल्यानंतर हे देश गरीब होणार का असा प्रश्न निर्माण होतो.
क्रूड ऑईल तयार करण्यासाठी लाखो वर्षे लागतात. याची सुरुवात समुद्रातून होते. समुद्रातील जीव मृ्त्यू पावतात. त्यानंतर त्यांचे मृतदेह समुद्राच्या तळाशी जातात. तिथं ते सडतात. लाखो टन वजनाचे कव्हर तयार होते. तेथील उष्णता आणि दबाव विशिष्ट पातळीवर जाते.
भूगर्भात हालचाली होत असतात. काळानुसार समुद्र दुसरीकडे सरकतो. त्याची जागा बदलते. उष्णता किंवा बाष्पीभवनामुळे हालचाल सुरू असते. जमिनीच्या आत ऑक्सिजन नसतो. ऑक्सिजन नसल्याने मोमसारखा पदार्थ तयार होतो. त्याला कॅरोजन म्हणतात. त्यालाच क्रूड ऑईल असं म्हटलं जातं.
१०० मिलीयन वर्षांपूर्वी अरब देशाच्या ठिकाणी समुद्र होता. भूगोलात त्याला टीथयस ओशीयन म्हटलं जातं. ज्वालामुखीमुळे पृथ्वीवर हालचाली झाल्या. जमिनीचा भाग सात महाद्विपांमध्ये विभागला गेला. अरब देशातील जमीन वर आली. टीथयस ओशीयन खाली गेला. परंतु,कोट्यवधी वर्षे दबलेला मॅटर आतमध्ये दाबला गेला. तिथं क्रूड ऑईल तयार झाला. तो भाग सर्वात मोठा इंधनाचा पुरवठादार बनला.
अरब देशाला हे माहीत आहे की, एक दिवस इंधनाचे साठे संपणार आहेत. अरब देशांनी त्या भागाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली आहे.