अमेरिकेत होत असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे सावत्र भाऊ असलेले मलिक ओबामा अचानक चर्चेत आले आहेत. साल 2008 मध्ये बराक ओबामा यांच्या निवडणूकीच्या वेळी देखील चर्चेत आले होते. विशेष म्हणजे मेरीलॅंड येथील ते मतदार असून यंदा त्यांनी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठींबा जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश घालण्याचे आश्वासन दिलेले आहे,तरीही स्वत: मुस्लीम असूनही मलिक ओबामा यांनी स्वतःच्या पार्श्वभूमीशी विरोधाभास करणारे वक्तव्य केले आहे.आपण ट्रम्प यांना मतदान करणार असल्याचा दावा मलिक ओबामा यांनी केला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे सावत्र भाऊ असलेल्या मलिक ओबामा यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की “मी मलिक ओबामा आहे. मी नोंदणीकृत रिपब्लिकन आहे आणि मी राष्ट्राध्यक्ष पदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करत आहे.” ही एआय जनरेट पोस्ट असल्याने ती नेमकी खरी आहे की नाही यावरुन चर्चा सुरु आहे.
एकेकाळी आपला भाऊ बराक ओबामा यांच्या लग्नात बेस्ट मॅन म्हणून कार्य करणाऱ्या आणि त्याबदल्यात बेस्ट मॅनचा सन्मान मिळवणाऱ्या मलिक ओबामा यांचे गेल्या काही वर्षांपासून आपल्या सावत्र भावाशी असलेले नाते ताणले गेले आहे. 2016 मध्येही त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता आणि ट्रम्प मोहिमेद्वारे लास वेगास चर्चेसाठी आमंत्रित केलेल्या विशेष पाहुण्यांपैकी ते एक होते.
2016 मध्ये वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात असे म्हटले होते की मलिक ओबामा याला 12 पत्नी आहेत. मात्र, त्यांनी आपल्याला तीन पत्नी असल्याचे म्हटले होते. 2011 मध्ये जेव्हा मलिक ओबामा यांनी तिसरी पत्नी म्हणून एका अल्पवयीन मुलीशी लग्न झाले होते. तेव्हा त्यांची बातमी हेडलाईन झाली होती.
ओबामा मलिक 2013 मध्ये केनियाच्या सिया काऊंटीमध्ये गव्हर्नरपदासाठी उभे होते. त्यावेळी, त्यांनी GQ ला सांगितले की, “हे सर्व काही जीन्समध्ये आहे.” मात्र ओबामांसोबतचे त्यांचे संबंध बिघडल्यानंतर, ते आता डोनाल्ट ट्रम्प यांचे समर्थक बनले आहेत. मला डोनाल्ड ट्रम्प आवडतात कारण ते मनापासून बोलतात,” असे मलिक ओबामा यांनी 2016 मध्ये वॉशिंग्टन पोस्टला सांगितले होते. “मेक अमेरिका ग्रेट अगेन ही त्यांची एक उत्तम घोषणा आहे. मला त्याला भेटायला आवडेल.”
ट्रम्प यांनी समलिंगी विवाहाला केलेला विरोध,आपल्या भावाच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीबद्दल असलेले असमाधान आणि लिबियाचे माजी प्रमुख मुअम्मर गद्दाफी यांच्याशी असलेली त्यांची मैत्री अशी कारणे मलिक ओबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठींबा देण्यामागे सांगितली आहेत.
2016 मध्ये मलिक ओबामा म्हणाले होते की, “मला अजूनही वाटते की [गद्दाफी] पासून सुटका केल्याने लिबियामध्ये काही चांगले झाले नाही. “माझा भाऊ आणि परराष्ट्र सचिव यांनी त्या संदर्भात मला निराश केले.”
“माझ्या भावाने मला अजिबात मदत केली नाही, जेव्हा मी फाऊंडेशन उभे केले तेव्हा मी ते बंद करावे अशी त्याची इच्छा होती. त्याने मला अजिबात साथ दिली नाही.” ते पुढे म्हणाले होते की, “प्रामाणिकपणे, माझा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीच्या बाहेर असेल तेव्हा मला आनंद होईल आणि मी शेवटचा प्रसिद्धीच्या झोतात येईन आणि माणसासारखे जीवन जगू शकेन.”