पॅरीस : त्याने नेहमीप्रमाणे त्याची आई कामावर निघण्यापूर्वी तिला किस करीत आय लव्ह मम म्हटले होते. त्याच्या आईसाठी आता तो कधीच आय लव्ह मॉम म्हणणार नाही. सतरा वर्षांच्या नाहेल याचा मंगळवारी पोलीस गोळीबारात मृत्यू झाला आहे. एका डीलिव्हरी बॉयच्या मृत्यूनंतर फ्रान्स अक्षरश: पेटले आहे. हिंसा रोखण्यासाठी फ्रान्स सरकारने आता 45 हजार पोलीसांना रस्त्यावर उतरविले आहे तरी हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीए…कोण आहे नाहेल ज्याच्या मृत्यूनंतर संपू्र्ण फ्रान्समध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
फ्रान्समध्ये एका ट्रॅफीक पोलीसाने डीलिव्हरी बॉय नाहेल याला थांबण्याचा इशारा करुनही तो थांबला नसल्याने त्याला गोळ्या घातल्या. 27 जून रोजी मंगळवारी घडलेल्या या घटनाक्रमानंतर अख्खं फ्रान्स पेटले असून नागरिकांनी सार्वजनिक मालमत्तांची नासधूस सुरु केली आहे. या पॅरीससह संपूर्ण फ्रान्समध्ये उद्भवलेल्या गृहयुद्ध जन्य परिस्थितीमुळे जगभरात या घटनेची चर्चा सुरु झाली आहे.
नाहेल एम. हा त्याची आई मौनिया यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडीलांचे नाव त्याला माहीती नाही, किंवा आईने कधी सांगितले नाही. नाहेल मुळचा अल्जेरीयन वंशाचा असून त्याचा शाळेतील कामगिरी इतकी उजवी नसल्याने त्याला डीलिव्हरी बॉयचे काम करीत होता. 27 जून रोजी त्याने आईला बिग किस करीत, ‘आय लव्ह मम’ असे म्हणत त्याने जो निरोप दिला तो अखेरचाच ठरला. कारण सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्याच्या कारला ट्रॅफीक पोलीसांनी थांबण्याचा आदेश दिला होता. परंतू तो थांबला नसल्याने त्याला संशयावरुन पोलीसांनी गोळ्या घातल्या त्यात तो जागीच गतप्राण झाला.
नाहेलवर एकही गुन्हा दाखल नव्हता. त्याला रग्बी खेळण्याचा छंद होता. शाळेत त्याची गैरहजेरीच जास्त होती. त्याला इलेक्ट्रीशियन बनायचे असल्याने त्याने त्यासाठी एका अकादमीत प्रवेश घेतला होता. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकूण त्याची आई मौनिया म्हणाली आता मी काय करु ? मी माझं सर्वस्व त्याच्यासाठी दिलं होतं, मला एकच मुल होतं. दहा मुले नव्हती. तोच माझं आयुष्य होता. माझा मित्र होता.’
ज्या ट्रॅफीक पोलीसाने त्याला गोळ्या घातल्या त्याला लहान मुलाचा चेहरा अरबी वाटला असावा. त्याला त्याचा जीव घ्यावासा वाटला. नाहेल आणि त्याच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायामुळे फ्रान्समधून खूप पाठींबा मिळत आहे. सोशलिस्ट पार्टीचे नेते ओलिवियर फाऊरे यांनी म्हटले आहे की, थांबण्यास नकार देणे म्हणजे तुम्हाला लायसन्स टु किलचा अधिकार नाही..सार्वभौम देशातील प्रत्येक मुलाला न्यायाचा अधिकार आहे.
फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे की पोलीस गोळीबारात या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर लागोपाठ चौथ्या रात्री व्यापक आंदोलन होत आहेत. देशभरात 1,311 जणांना अटक झाली आहे. अडीच हजार दुकानांना आंदोलकांनी आगी लावल्या आहेत. नॅनटेरेच्या उपनगरात पोलीस गोळीबारात ठार झालेल्या नाहेल याच्या दफनविधीची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.