बोइंगचा स्टारलाइनर कॅप्सुल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून खाली येणार आहे. त्यात कोणताही अंतराळवीर नसेल, अशी घोषणा नासाने केली आहे. नासाने प्रणोदन प्रणाली (Propulsion System)मध्ये सुरू असलेल्या तांत्रिक बिघाडाचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे. त्यामुळे बोइंगची समस्या अधिकच वाढणार आहे. स्टारलाइनर कॅप्सुल रिकामं येण्याने बोइंगला 1 बिलियनहून अधिक डॉलरचं नुकसान होणार आहे. अंतराळवीर बूच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनवर सहा महिने राहिल्यानंतर फेब्रुवारी 2025मध्ये एलन मस्कच्या स्पेसएक्सच्या क्रू-9 ने पृथ्वीवर येणार आहे. स्टारलाइनरच्या थ्रस्टर्सच्या समस्येमुळेच नऊ दिवस परीक्षण चाचणीला उशीर झाला. नासा आणि बोइंगमधील तांत्रिक असहमतीच्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. नासाने सुरक्षेला अधिक प्राथिमिकता दिली असून दोन्ही अंतराळवीरांना आणण्यासाठीच स्पेसएक्सची निवड केली.
नासाचं म्हणणं काय?
नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बोइंगने हा निर्णय घेण्यासाठी आवश्यक डेचा प्राप्त करण्यासाठी नासासोबत अत्यंत कठोर मेहनत केली आहे. आम्हाला मूळ कारणं एकमेकांशी शेअर करायची असून डिझाइनमध्ये सुधारणा करायची आहे. असं केल्याने बोइंग स्टारलाइनर स्पेस स्टेशनमध्ये आमच्या चालक दलाच्या पर्यंत जाऊ शकेल, असं नेल्सन यांनी सांगितलं. स्टारलाइनर मिशन सारखी चाचणी उड्डाणे एक तर सुरक्षित नाहीत आणि नियमितही नाहीत, असंही नेल्सन यांनी सांगितलं. निर्णयानंतर रिकामं स्टारलाइनर कॅप्सुल पृथ्वीवर आणण्यासाठी योग्यवेळ ठरवली जाईल. त्यासाठी नासा याबाबतचा एक टप्पा ठरवेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
सुरक्षेवर नासाचा जोर
बोइंगच्या आश्वासनाच्या नंतरही आपत्कालीन चालक दलाला परत आणण्यासाठी स्टारलाइनर सुरक्षित आहे, यावर नासा सहमत नाहीये. नेल्सन यांनी बोइंगचं समर्थन केलं आहे. ते म्हणाले की, स्टारलाइनर भविष्यात पुन्हा क्रूच्यासोबत लॉन्च होणार याचा 100 टक्के विश्वास आहे. नासाद्वारे निर्धारीत मिशन आम्ही यशस्वी करू आणि चालकदलाला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्याची तयारी करू. यावर बोइंगकडूनही प्रतिक्रिया आली आहे. आम्ही सर्वात आधी महत्त्वाच्या चालक दल आणि अंतराळ यानांच्या सुरक्षेवर ध्यान केंद्रीत करत आहोत. आम्ही नासाद्वारे निर्धारीत मिशनला क्रियान्वित करत आहोत. आम्ही अंतरीक्ष यानाला चालक दलासाठी सुरक्षित आणि परत आणण्यासाठी तयार करत आहोत, असं बोइंगने म्हटलं आहे.
स्पेसएक्सवर सर्व सहमत
नासाचे असोसिएटस ॲडमिनिस्ट्रेटर केन बोवर्साक्स यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नासाचे अधिकारी क्रूची वापसी करण्यासाठी स्पेसएक्सची निवड करण्यावर एकमत होते. याच दरम्यान विल्मोर आणि सुनीतासाठी त्यात जागा बनवण्याकरता स्पेसएक्स आपलं क्रू-9 हे वाहन त्यांना परत आणेल, असं केन यांनी सांगितलं. बोइंग स्टारलाइनर कॅप्सुल कॅलिप्सो जूनपासून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आहे. थ्रस्टरमधील बिघाडामुळे ते अनिश्चित काळासाठी स्पेस स्टेशनमध्येच राहण्याची शक्यता आहे.