नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमासच्या लढाईत हमासच्या एका कमांडरचे नाव खूप चर्चेत आहे. या कमांडरला इस्रायलवर वर्षाव केलेल्या पाच हजार रॉकेट हल्ल्याचा सूत्रधार म्हटले जात आहे. या कमांडरला ‘दि गेस्ट’ या नावाने ओळखले जाते. हा कमांडर इतका खतरनाक आणि धर्त आहे की अनेकांनी त्याला अजून पाहिलेले नाही. त्याचे ओळख अनेकांना माहिती नाही. इस्रायलच्या लाख प्रयत्नांनी देखील ते त्याला पकडू शकलेले नाहीत.
हमासच्या या खतरनाक कमांडरचे खरे नाव आहे मोहम्मद दियाब इब्राहिम अल-मसरी आहे. त्याला ‘मोहम्मद डीफ’ या किंवा ‘दि गेस्ट’ या टोपण नावाने ओळखले जाते. या कमांडरला दि गेस्ट नावाने संबोधण्यामागे त्याचा स्वभाव कारणीभूत आहे. तो कधी एका ठिकाणी थांबत नाही. तसेच सर्वसामान्याच्या घरात पाहुणा म्हणून थांबतो. दर रात्री आपला मुक्काम एका ठिकाणाहून दुसऱ्या गुप्त जागी बदलत राहतो. म्हणूनच त्याचे ‘दि गेस्ट’ किंवा ‘द गेस्ट’ नाव पडल्याचे म्हटले जाते.
1960 च्या दशकात जन्मलेला ‘द गेस्ट’ला सर्वसामान्य पॅलेस्टिनी खूप कमी ओळखतात. बहुतांशी पॅलेस्टिनी लोकांसाठी तो भूतासारखाच वावरत असल्याने त्याच्याविषयी त्याच्या नावाविषयी फारसी कोणालाही काही माहिती नाही. इस्रायलवर हमासच्या आश्चर्यकारक हल्ल्याच्या काही तासांनंतर ‘द गेस्ट’ किंवा ‘डीफ’ एका व्हिडीओ संदेशात दिसला होता. यात त्याने ‘ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म’ चा प्रारंभ केल्याची घोषणा केली होती. यात संदेश देताना तो म्हणाला होता, खूप झाले आता आम्ही सर्व संपविण्याचा निर्णय घेतला आहे.
डीफ 1990 ला हमासमध्ये सामील झाला होता. त्याने बॉम्बच्या निर्मिती प्रावीण्य मिळविले. त्याच्यावर 1995 नंतर अनेक आत्मघाती बॉम्बस्फोटांचा कट रचल्याचा आरोप आहे. तसेच इस्रायलींच्या हत्येसाठी त्याला जबाबदार ठरविले आहे. गाझा पट्टीतील भुयार निर्मिती असो की कासिम रॉकेटचा विकास सर्वजण यात ‘द गेस्ट’चा हात असल्याचे म्हणतात.